पुणे : वाहतुकीस अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

दांडेकर पुल व जुनी दत्तवाडी येथील अतिक्रमणामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतुकीला अडथळा ठरणारी काही धार्मिक स्थळे शनिवारी मध्यरात्री हटविण्यात आली.

पुणे : रस्त्याच्या जवळ असणारी आणि वाहतुकीला अडथला ठरणारी काही धार्मिक स्थळे महापालिकेकडुन शनिवारी मध्यरात्री हटविण्यात आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दांडेकर पुल व जुनी दत्तवाडी येथील अतिक्रमणामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतुकीला अडथळा ठरणारी काही धार्मिक स्थळे शनिवारी मध्यरात्री हटविण्यात आली.

त्यामध्ये दांडेकर पुल येथील मुख्य चौकातील रिक्षा स्टँडजवळ असलेले एक धार्मिक स्थळ, तसेच जुनी दत्तवाडी येथील 3 धार्मिक स्थळे हटविण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Religious places replaced which have blocked obstruction of traffic in Pune