esakal | धार्मिक अधिवेशनही आता होतेय ऑनलाईन!
sakal

बोलून बातमी शोधा

धार्मिक अधिवेशनही आता होतेय ऑनलाईन!

- पुलकमंचाच्या झोन सातचे अधिवेशन ऑनलाईन पध्दतीने झाले.

धार्मिक अधिवेशनही आता होतेय ऑनलाईन!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्याच जीवनात बदल होत आहे, धार्मिक संघटनांनाही आता आधुनिकतेची कास धरण्यास प्रारंभ केला असून, पुलकमंचाचे राष्ट्रीय अधिवेशन व्हर्च्युअल पद्धतीने ऑनलाईन केले गेले. इतिहासात पहिल्यांदाच असे धार्मिक अधिवेशन ऑनलाईन झाल्याने त्याची वेगळी नोंद घेतली गेली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रविवारी (ता. 31) पुलकमंचाच्या झोन सातचे अधिवेशन ऑनलाईन पध्दतीने झाले. डॉ. वर्षा कोठारी, अतुल गांधी, धवल शहा (वाघोलीकर), राजेंद्र सरगर यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे, औरंगाबाद, नातेपुते, नीरा, लोणंद, बारामती यासारख्या ठिकाणचे मोजकेच कार्यकर्ते यात सहभागी झाले. आचार्य श्री पुलकसागरजी महाराजांनीही या अधिवेशनामध्ये सर्वांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी शासकीय संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपापल्या गावातून या अधिवेशनात सहभागी झाल्याची माहिती राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचाच्या महामंत्री प्रियांका दोशी यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीच्या शाखेला झोन सात अंतर्गत सर्वोत्कृष्ट शाखेचे पारितोषिक नुकतेच प्राप्त झाले आहे. बारामती पूलक मंचचे मोरेश्वर पाठक व अमोल दोशी व महिला मंचच्या संगीता वाघोलीकर, कीर्ती पहाडे यांना शाखेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या अधिवेशनच्या मुख्य अतिथी शोभाताई धारिवाल, पूलक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद फांदोत, महामंत्री प्रदिप जैन,  कार्याध्यक्ष सुनील काला,  अंकित जैन,  चन्द्र प्रकाश बौद तसेच महिला मंचाचे राष्ट्रीय अध्यक्षा मीना झाझरी, महामंत्री बिना टोंग्या,  कार्याध्यक्षा पूनम विनायका उपस्थित होते. 
आभार धवल शहा (वाघोलीकर) यांनी मानले. अधिवेशनचे संचालन  प्रियांका दोशी यांनी केले.