
आयुष्य शर्मा या चित्रपटात गॅंगस्टरच्या भूमिकेत असून या चित्रपटात सलमान खान याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. मुळशी पॅटर्नमध्ये अभिनेता ओम भूतकर याने साकरेल्या भूमिकेत आयूष रिमेकमध्ये दिसणार आहे.
पुणे : अभिनेता प्रविण तरडे यांचा २०१८ मध्ये गाजलेला चित्रपट मुळशी पॅटर्नचा रिमेक 'अंतिम...द फायनल ट्रुथ'' चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटाचे शुटींग पुण्यात सध्या सुरु असून शनिवार पेठेत ओमकारेश्वर मंदिरात पाठलाग करताचे सीन शुटींग झाले. यावेळी शुटींगसाठी अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेता निकितन धीर पुण्यात आले होते.
हे ही वाचा: 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी अशी बदलली, दिवाळीमधील फोटो झाले व्हायरल
अभिनेता आयूष शर्मा याने अभिनेता सलमान खानची बहिण अरपिता हिच्याशी लग्न केले असून आज दोघांच्या लग्नाची सहावी एनिवर्सरी आहे तर, अभिनेता निकितिन धीर याने अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली असून चेन्नई एक्सप्रेसमध्ये 'तंगबल्ली' भूमिका चांगलीच गाजली होती.
आयुष्य शर्मा या चित्रपटात गॅंगस्टरच्या भूमिकेत असून या चित्रपटात सलमान खान याच चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. मुळशी पॅटर्नमध्ये अभिनेता ओम भूतकर याने साकरेल्या भूमिकेत आयूष रिमेकमध्ये दिसणार आहे.
बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाणं का टाळतो अक्षय कुमार? केला स्वतःच खुलासा
दिग्जदर्शक महेश मांजरेकर याबाबत म्हणाले, या चित्रपटाचे काही सीन्स पुण्यातील काही ठिकाणी शुट केले आहे. मी पुण्यात बऱ्याच चित्रपटांचे शुटींग केले आहे. पुणे हे शुट फ्रेंडली शहर आहे. यावेळीही त्याचा अनुभव आला. न्यु नार्मलमुळे नक्कीच कामच्या स्वरुपात काही बदल झाले आहेत पण पुण्यात सर्वांनी खूप मदत केली.''