Pashan News : पीएमपीच्या थांब्याअभावी प्रवाशांचे हाल; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Pashan Sai Chowk bus stop removed : पाषाण-सूस रस्त्यावरील साई चौकातील पीएमपी बसथांबा हटविल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टता नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना उन्हात बसची वाट पाहावी लागत आहे.
Pashan Sai Chowk bus stop removed

Pashan Sai Chowk bus stop removed

sakal

Updated on

पाषाण : पाषाण-सूस रस्त्यावरील महत्त्वाच्या असणाऱ्या साई चौकातील पीएमपीचा बसथांबा हटविल्याने येथील प्रवाशांची होणारी गैरसोय आता प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक बनली आहे. या ठिकाणी बसथांबा नसल्याने प्रवाशांना बसची वाट पाहत बराच वेळ उन्हात उभे राहावे लागते. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले आणि ज्येष्ठांना होतो. त्यामुळे येथे तातडीने बसथांबा बसविण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com