बेडशिंग-बाभुळगाव रस्त्यावर येणारी झुडपं काढावीत : अभिजित तांबीले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

वडापुरी : इंदापूर तालुक्यातील बेडशिंग-बाभुळगाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे वाढली असून ते रस्त्यावर येत असल्याने काढून टाकावेत यासाठी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे.

यावेळी तांबीले म्हणाले की, बेडशिंग- बाभुळगाव रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहने व मोटार सायकल जात असतात, परंतु रस्त्यावर आलेल्या काटेरी झाडामुळे वाहन चालवताना त्रास होत असल्याने ही काटेरी झुडपे काढावित. यासाठी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे मागणी केली असल्याचे तांबीले यांनी सांगितले असून या रस्त्याच्या कामासाठी 5 लाख मंजूर झाले असल्याचे तांबीले यांनी सांगितले. 

Web Title: remove the trees which comes on bedshing babhulgao road said abhijit tambile