Pune Police Colony : पोलिस वसाहतींची डागडूजी करूण घराचा प्रश्न मार्गी लावण्याची मगणाी

शहरात असलेल्या पोलिस वसाहतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून काही वसाहतीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून राहावे लागते. शहरामध्ये औंध, खडकी, भवानी पेठ, सोमवार पेठ, खडक, स्वारगेट, शिवाजीनगर या परिसरात पोलिस वसाहती आहेत. यामधील काही इमारती जीर्ण झाल्या आहेत.
Pune Police Colony
Pune Police Colonysakal

शिवाजीनगर : शहरात असलेल्या पोलिस वसाहतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून काही वसाहतीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून राहावे लागते. शहरामध्ये औंध, खडकी, भवानी पेठ, सोमवार पेठ, खडक, स्वारगेट, शिवाजीनगर या परिसरात पोलिस वसाहती आहेत. यामधील काही इमारती जीर्ण झाल्या आहेत.

त्यामुळे येथे राहणाऱ्या कुटुंबांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते . पाणी टंचाई, तुटलेली तावदाने, छत व भिंतीचे उखडलेले प्लास्टर, पावसाळ्यात पाणी गळती होणे, विस्कटलेल्या वायरी, धूळ, कचरा , शैचालयाचे तुटलेली दरवाजे अशा अनेक समस्यांना पोलिस बांधव सामोरे जात आहेत. जीर्ण झालेल्या इमारती नवीन बांधून मिळव्यात व काही इमारतींची डागडूजी करावी तसेच जे पोलिस अधिकारी व कर्मचारी शासनाच्या घराचा लाभ घेत नाहीत अशा सर्वना घरभाडे भत्ता मासिक वेतनात चालू करावे अशी मागणी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभाग यांच्या वतीने अॅड.अरुण लंबुगोळ, नरेंद्र तांबोळी, अॅड. योगेश आढाव, योगेश खडके यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

''जवळपास शंभर वर्षापूर्वी बांधलेल्या जुन्या वसाहती आहेत, त्या वसाहती पडायला आल्या आहेत. या संदर्भात शासनाकडे नियमित पत्रव्यवहार करण्यात आला परंतु राजकीय नेत्यांना पोलिसांकडे लक्ष देयला वेळ नाही. हे पोलिस कर्मचारी दिवसातून १२ ते १४ तास नागरिकांची सेवा करतात. जवळपास ७ ते ८ हजार पोलिस कर्मचारी घराच्या प्रतिक्षा यादीमध्ये आहेत. महापालिकेच्या हाद्दीमध्ये अनाधिकृत बांधकामे झाली आहेत ती न पाडता सबंधीत बांधकाम व्यावसायिकाबरोबर सकारात्मक चर्चा करून ती घरे पोलिसांना राहायला देण्यात यावी.''

- राजेद्र कपोते, अध्यक्ष पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य

आम्ही १९९१ ते २०२१ या दरम्यान सोमवार पेठेतील वसाहतीमध्ये राहायला होतो. त्या वेळी आमच्याकडून दुरूस्तीसाठी पैसे घेतले जायचे परंतु दुरूस्ती केली जात नव्हती. ती ब्रिटीशकालीन वसाहत आहे, जुन्या वसाहती जीर्ण झाल्याने पडायला आल्या आहेत.

- अशोकराव हुंडेकरी , सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी

शिवाजीनगरमध्ये २२ मजली दोन इमारती झाल्या असून त्या ठिकाणी पोलिस राहायला आले आहेत , तसेच सध्या २२ मजली आठ इमारतींचे काम सुरू आहे. यातील ६ इमारती पोलिस कर्मचाऱ्यांना व २ इमारती आधिकाऱ्यांना असतील. प्रत्येक इमारतीमध्ये २ बीएचके ८४ सदनिका आहेत. यामुळे येत्या काही दिवसात पोलिसांच्या घराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. वसाहतीमध्ये डागडुजीचे काम चलू आहेत.

- अरविंद चावरिया, अपर पोलिस आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com