Ajay Pohankar : अभिजात भारतीय संगीत चिरंतन टिकेल ; ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांना विश्वास

अभिजात भारतीय संगीतात काळानुरुप काही बदल होतील. कदाचित रागांची नावे बदलतील; पण हे संगीत चिरंतन टिकेल’’, असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी बुधवारी (ता. २७) व्यक्त केला.
Ajay Pohankar
Ajay Pohankarsakal

पुणे : ‘‘अभिजात भारतीय संगीतात काळानुरुप काही बदल होतील. कदाचित रागांची नावे बदलतील; पण हे संगीत चिरंतन टिकेल’’, असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी बुधवारी (ता. २७) व्यक्त केला.

अंबादास टल्लू फाउंडेशनतर्फे आयोजित ‘अजेय स्वरोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते. पं. पोहनकर यांची संगीत मैफील व त्यांच्याशी संवाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी पं. पोहनकर यांच्याशी संवाद साधला. मैफीलीत पं. पोहनकर यांना उमेश पुरोहित यांनी संवादिनीवर आणि संदीपन मुखर्जी यांनी तबल्यावर साथसंगत केली.

पं. पोहनकर म्हणाले, ‘‘घरामध्ये आईकडून मिळालेल्या शिक्षणानंतर वयाच्या दहाव्या वर्षी नागपूरला पहिली मैफल झाली होती. दोनच वर्षांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांनी सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवात मला गाण्यासाठी बोलावले होते. जबलपूर येथे आमच्या घरी प्रत्येक घराण्याचे मोठे गायक येत असत. उस्ताद अमीर खाँसाहेबांच्या गायकीचा माझ्यावर प्रभाव पडला. पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाची शैली मला आवडते.’’

या वेळी पोहनकर यांनी ठुमरी, गझल, भैरवी आदींचे सौंदर्यस्थळे उलगडून दाखवत त्यामागील आपला विचार सांगितला. पत्नी अंजली यांनीही त्यांना साथ दिली. या वेळी ज्येष्ठ गायक डॉ. कमलाकर परळीकर, पं. सत्यशील देशपांडे, फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा टल्लू, अमरिश टल्लू उपस्थित होते.

संगीत टिकावे म्हणून जुन्या पिढीतील कलाकारांचे संगीत ऐकावे. त्यात आपल्या विचारांनी नवा शोध घेऊन, सौंदर्यदृष्टी भरून ते

सादर करावे.

- पं. अजय पोहनकर, ज्येष्ठ गायक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com