लोकसभेच्या मेरीटमध्ये पुणे जिल्ह्यातून अव्वल खासदार कोण ? सुळे, बारणे, बापट आणि डॉ. कोल्हे?

report card member of parliament from pune district
report card member of parliament from pune district

पुणे : केंद्र सरकारला सर्वाधिक प्रश्न विचारणे, सभागृहातील चर्चेत सहभागी होणे, स्वतंत्र विधेयके मांडण आणि महत्त्वाचे जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहणे या प्रमुख निकषांच्या आधारे पुणे जिल्ह्यातून खासदार सुप्रिया सुळे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर श्रीरंग बारणे, गिरीश बापट आणि डॉ. अमोल कोल्हे या खासदारांनीही चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील खासदार लोकसभेच्या मेरीटमध्ये आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील प्रत्येक खासदाराच्या कामगिरीचा लेखाजोगा पुण्यातील परिवर्तन या स्वयंसवी संस्थेने खासदार डॉट इन्फो या संकेतस्थळावर मांडला आहे. त्यातून महाराष्ट्रातील खासदारांचे रिपोर्ट कार्ड उघड झाले आहे. त्यात खासदारांनी लोकसभेत 30 मे पर्यंत केलेल्या कामगिरीवर त्यांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातन तिसऱयांदा खासदार झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. लोकसभेत त्या पक्षाच्या प्रमुख असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना बोलण्याची संधी इतरांपेक्षा जास्त मिळाली. पक्षाची भूमिका त्यांना ठामपणे मांडता आली. बारणे यांची दुसरी टर्म असल्यामुळे ते आता लोकसभेला सरावले आहेत. हे त्यांच्या प्रश्नांच्या वैविध्यातून दिसून येते तर, बापट हे पूर्वी विधानसभेत संसदीय कार्यमंत्री असल्यामुळे सभागृहातील उपस्थिती, प्रश्न मांडण्याची आणि विचारण्याची कला, त्यांना अवगत आहे. त्याचा उपयोग त्यांना लोकसभेतही होत आहे. तर, डॉ. कोल्हे हे सभागृहात नवखे असले तरी, होमवर्क करून ते मैदानात उतरले आहेत. अभिनेते असल्यामुळे सभागृहातील उपस्थितीवर काहीसा परिणाम झाला तरी ती कसर त्यांनी प्रश्न आणि चर्चांच्या सहभागातून भरून काढली आहे.

संसदीय आयुधांत बाजी 
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तिसऱयांदा खासदार झालेल्या सुळे या पूर्वी राज्यसभेतही होत्या. त्यामुळे संसदेतील आयुधांची त्यांना आता चांगल्या प्रकारे माहिती झाली आहे. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी होताना मताधिक्य घटल्यामुळे त्यांनी इर्षेने जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला. त्यामुळे ग्राऊंडवर काम वाढविण्यासाठी त्या राज्यभर फिरल्या. दुसरीकडे लोकसभेत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. त्यासाठीच त्यांनी तब्बल 212 प्रश्न विचारले. खासगी विधेयके मांडली अन चर्चेतही सातत्याने सहभाग नोंदविला. 

या प्रश्नांवर उठवला आवाज 
जम्मू काश्मीरसाठीचे कलम 370, तिहेरी तलाख, शेतीमालाचा हमी भाव, दोन्ही पालखी मार्गांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामे, राज्यात रेल्वेचे रखडलेले प्रकल्प, पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना न्याय मिळवून देणे, रोजगार निर्मिती, महिला सुरक्षिता, तृतीयपंथियांना हक्क आणि अधिकार, मुद्रा लोनमुळे वाढणारे अनुत्पादक कर्जाचे प्रमाण आदी

अल्पावधीत दिल्लीत बस्तान
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची यंदाची दुसरी टर्म. नगरसेवकपदाच्या दोन टर्म, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद, शहराध्यक्ष, विधानसभा निवडणुकीची उमेदवारी, अशा प्रकारचा अनुभव पाठिशी असल्यामुळे त्यांना 2014 मध्ये शिवसेनेने मावळच्या खासदारकीची उमेदवारी दिली. त्यात पहिल्याच झटक्यात ते निवडून आले आणि 2017 मध्ये त्याची पुनरावृत्ती केली. स्थानिक राजकारणाचा दांडगा अनुभव असल्यामुळे अल्पावधीत त्यांनी दिल्लीतही बस्तान बसविले आणि आपल्या कार्यक्षमतेचा परिचय करून दिला. 

या प्रश्नांवर उठविला आवाज
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, पुणे- पनवेल- कर्जत मार्गासाठी भूसंपादन, पुणे- लोणावळा लोकलच्या तिसऱया आणि चौथ्या लाईनची अंमलबजावणी, उस उत्पादक शेतकऱयांना  चांगला निर्धारित भाव मिळावा, शहीद जवानांच्या मुलांचा खर्च केंद्र सरकारने करावा आणि त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, दुर्गम भागातील पोस्टमनला अधिक सुविधा द्याव्यात आदी. 

कार्यक्षमतेचीही उद्दिष्टपूर्ती
तीन टर्मचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, 6 टर्मचे आमदार, पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री असा प्रवास करीत खासदारकीपर्यंत पोचलेले पुण्याचे गिरीश बापट यांचे दिल्लीत पक्षवर्तुळात नेटवर्क स्ट्रॉंग आहे. त्यामुळे अपेक्षापूर्ती करण्याची जबाबदारी बापट यांच्यावर आली आहे. वयोमान, प्रकृतीच्या कुरबुरी सांभाळत यांनी बापट यांनी त्यातही यश जिद्दीने मिळविलेच. सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्यामुळे सभागृहात बोलण्याची फारशी संधी मिळत नसताना बापट यांनी अन्य संसदीय आयुधे वापरून मुरलेला लोकप्रतिनिधी कसा असतो, हे दिल्लीत दाखवून दिले. 

उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न 
पुणे- नाशिक रेल्वे, लोहगा विमानतळाचे विस्तारीकरण, चांदणी चौक उड्डाण पूल, मांजरी पाणी पुरवठा योजनेसाठी पाठपुरावा, पुण्याजवळच्या राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामे, मेट्रो प्रकल्पासाठी लष्कराची जागा मिळावी, पुणे, खडकी, देहूरोड कॅंटोन्मेंटला केंद्राचा निधी मिळावा आणि त्यांच्यासाठीच्या कायद्यात बदल व्हावा आदी.

लोकसभेतही अभिनेते चमकले

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शिरूरचे खासदार झाले. एक अभिनेता खासदार म्हणून चांगले काम करू शकेल का, अशी साशंकता होती. परंतु, लोकसभेतील 80 दिवसांच्या कामकाजात डॉ. कोल्हे यांनी त्यांच्यातील राजकीय नेताही दाखवून दिला अन एक समर्थ लोकप्रतिनीधीही. पहिल्यांदाच खासदार झाल्यामुळे प्रश्न विचारण्याची पुरेशी संधी न मिळताही त्यांनी मिळालेल्या संधीतून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. डॉ. कोल्हे यांना पक्षाने दिलेल्या पाठबळाचा आणि प्रत्येक संधीचा फायदा करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला अन आपलाही ठसा उमटवला. 

खासदार मतदारसंघ लोकसभा उपस्थिती विचारलेले प्रश्न चर्चांमधील सहभाग
सुप्रिया सुळे बारामती 88.75 टक्के 212 97
श्रीरंग बारणे मावळ 92. 50 टक्के 194 48
गिरीश बापट पुणे 86. 25 टक्के 82 10
डॉ. अमोल कोल्हे शिरूर 58.75 टक्के  202 8

या विषयांवर त्यांनी उठविला आवाज 
पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग, आदिवासी क्षेत्रात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारणे, बैलगाडा शर्यत बंदीबाबत, शिवनेरी किल्ला जतन व संवर्धन करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com