पुण्यातल्या सोसायट्यांसाठी पोलिसांची नियमावली; नियम काळजीपूर्वक वाचा!

pune police guidelines for housing societies
pune police guidelines for housing societies

पुणे : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे त्यापासून नागरीकांचे संरक्षण करण्यासाठी पुणे पोलिसांकडून सोसायटीतील रहिवासी व पदाधिकाऱ्यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. शहरातील सोसायट्यांनी या नियमांचे काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे व कोरोनाबाधीत कुटुंबाशी गैरवर्तन न करण्याचे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी केले आहे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोसायटीमध्ये कोरोना रूग्ण आढळल्यास कोरोनाबाधित व्यक्ति किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभुमीवर अशा व्यक्ती किंवा कुटुंबांशी गैरवर्तन करु नये. उच्च रक्तदाब, मधुमेह, हदयविकार असलेल्या रहिवाशांची विशेष काळजी घ्यावी आणि रुग्ण, रहिवासी, संपर्कातील व्यक्ती, निवासी विलनीकरण केलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करण्याचे आवाहनही मोराळे यांनी केले.

सोसायट्यांसाठीची नियमावली

  • सोसायटीच्या आवारात वावरताना एकमेकांमध्ये अंतर राखावे. गर्दी करू नये.
  • परदेशातून, परराज्यातून आलेल्या रहिवाशांना विलगीकरणाबाबत सूचना द्यावी, विलगीकरण झाल्यास खातरजमा करावी.
  • घरकामास येणाऱ्या महिलांना अडवू नका. त्यांच्याकडील मोबाइल, चाव्या व पर्स ठेवण्यासाठी कापडी बॅग द्यावी. हात, चेहरा साबणाने स्वच्छ धुवायला सांगणे.
  • घरकाम करणाऱ्या महिलांना मास्कचा वापर करण्याबरोबरच व सामाजिक अंतर पाळण्याबाबत सूचना द्याव्यात. सोसायटीत दूध, भाजी, वृत्तपत्रे वितरण करणाऱ्या व्यक्ती, सफाई कर्मचारी, वस्तू विक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला आल्यास त्यांची प्रवेशद्वारावरच तापमापकाद्वारे तपासणी  करावी, सैनिटायझरचा वापर करण्यास सांगावे.
  • घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षारक्षक वाहनचालक शक्यतो प्रतिबंधित भागात राहणारे नसावेत.
  • सोसायटीतील पावसाळी दुरुस्तीसाठी, फर्निचर, विद्युतकामे काही कालावधीसाठी थांबवावीत.
  • सोसायटीत नवीन बांधकामे किंवा नुतनीकरणाची कामे सध्या करु नयेत.
  • पोलिस नियंत्रण कक्ष – १००
  • रुग्णवाहिका - १०८

ऑक्सिजन पातळी तपासा
सोसायटीत येणारे रहिवासी तसेच अन्य व्यक्तींना मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक करावे. प्रवेशद्वाराजवळ साबण, जंतुनाशके, हात धुण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. सोसायटीतील लिफ्ट, जिने, स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखावी. शक्यतो या भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सोसायटीत येणाºया प्रत्येकाची तापमापकाद्वारे तपासणी करावी. ऑक्सिमीटर यंत्राद्वारे ऑक्सिजन पातळी तपासून घ्यावी. ऑक्सिजनची पातळी ९५ पेक्षा कमी असल्यास त्वरीत संबंधित व्यक्तीची तपासणी करुन घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com