शिरूरमध्ये मुंबईतून आलेल्या त्या चौघांचाही अहवाल... 

युनूस तांबोळी
शनिवार, 23 मे 2020

या चारही जणांचा गावातील काही लोकांशी संपर्क आला होता. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

टाकळी हाजी (पुणे) : मुंबईतील जावयाने शिरूर तालुक्‍यातील कवठे येमाई येथे सोडलेल्या आजी, आजोबा व एका नातीनंतर दुसरी नातदेखील कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे, अशी माहिती कवठे येमाई येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी यांनी माहिती दिली. 

सासवडकरांचे टेन्शन वाढले, शहराजवळील गावात कोरोनाचा रुग्ण  

मुंबईवरून जावयाने आपले सासू-सासरे व त्यांच्या दोन नातींनी कवठे यमाई येथे सोडले होते. कवठे प्राथमिक रुग्णालयाच्या सल्ल्याने त्यांना सांस्कृतिक भवनात क्वारंटाइन करण्यात आले होते. परंतु, त्यांचा मुंबईत असणारा मुलगा व सून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यात मुलाचा मृत्यू झाला असल्याचे समजल्यावर या चार जणांची पुणे (औंध) येथे कोरोना टेस्ट करण्यात आली. यात 19 मे रोजी चारपैकी तीन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता. 22) चौथ्या लहान नातीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कवठे येमाई गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या चारही जणांचा गावातील काही लोकांशी संपर्क आला होता. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची काळजी गाव व प्रशासन घेत असले; तरी गावात चेक पोस्ट तयार करून विशेष काळजी घेतली जात आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या चेक पोस्टवर शिक्षक, पोलिस व ग्रामस्थ यांचा सहभाग आहे. कवठे येमाई परिसरात मुंबईवरून येणाऱ्या लोकांना त्या त्या परिसरात क्वांरटाइन करण्यात येत आहे. ग्रामस्थांना घरात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. चेक पोस्ट तयार करून नागरिकांची काळजी घेतली जात आहे. प्रशासनाने या भागात सहकार्य करण्याचे आवाहन पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The report of those four who came from Mumbai in Shirur