पत्रकार निशा पिसे यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

पिंपरी- चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा निशा प्रशांत पिसे ( वय 34) यांनी गुरूवारी (ता. 31) रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून निशा यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.​

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा निशा प्रशांत पिसे ( वय 34) यांनी गुरूवारी (ता. 31) रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून निशा यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी निशा पिसे यांचे बंधू महेश शिंगोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनेक वर्षापासून त्या पत्रकार म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या एका दैनिकात उपसंपादकपदाची जबाबदारी सांभाळत होत्या. काल रात्री पावणेनऊ वाजता त्या कार्यालयातून घरी गेल्या. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला. सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कौटुंबिक वादातून निशा यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी निशा यांचा पती प्रशांत पांडुरंग पिसे व सासऱ्याला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reporter Nisha Pise Suicide