शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्यास लोकप्रतिनिधी अपयशी

राजकुमार थोरात 
शुक्रवार, 18 मे 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्यास अपयशी ठरले अाहेत. लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे चार हजार दोनशे एकरावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा गंभीर आरोप माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांच्यावर नाव न घेता त्यांच्यावर केला.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्यास अपयशी ठरले अाहेत. लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे चार हजार दोनशे एकरावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा गंभीर आरोप माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांच्यावर नाव न घेता त्यांच्यावर केला.

निरवांगी (ता.इंदापूर) येथे बावीस गावातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. यावेळी कॉग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड.कृष्णाजी यादव, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, माजी सभापती विलास वाघमोडे, उपसभापती देवराज जाधव, जयकुमार कारंडे, गाेविंद रणवरे, निरवांगीचे माजी सरपंच दत्तात्रेय पोळ, सुभाष पोळ उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी सांगितले की,गेल्या चार वर्षापासुन तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यास अडचण येत आहे. चार वर्षापासुन सणसर कटमधून लोकप्रतिनिधींना एक पाण्याचा थेंब ही आणता  अाला नाही. धरणामध्ये शिल्लक पाणी साठा असताना देखील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. उन्हाळी हंगातील पाण्याचे आवर्तन 13 मार्च पासुन सुरु झाले. मात्र इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पहिलेच पाण्याचे आवर्तन सुरु अाहेत.

अनेक गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळालेच नाही. याउलट बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सुरु झाले आहे. आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी कुठे जात आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. बारामती व इंदापूर तालुक्यामधून कालव्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने पाटबंधारे  विभागातील अधिकाऱ्यावरती वचक राहिला नाही. पाण्याचे योग्य नियोजन करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास विलंब होत अाहे.1995 ते 2014 या कालावधीमध्ये पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली नव्हती.मात्र आत्ता संघर्ष केल्याशिवाय पाणी मिळणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान गुरुवारी (ता.17) माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील शंभर शेतकऱ्यांना बरोबर घेवून पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांची भेट घेवून इंदापूर तालुक्यातील कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली. यांसदर्भात पाटील यांनी सांगितले की, धरणामध्ये 4 टीएमसी पाणी शिल्लक अाहे. 22 मे पासुन दुसरे आवर्तन सुरु होणार असून तालुक्यातील 36 ते 59 क्रमांकाच्या वितरिकेवरील सर्व शेतकऱ्यांना वेळेत पाणी वेळेत मिळावे यासाठी स्वत: चोपडे तालुक्यामध्ये थांबणार असून सर्व शेतकऱ्यांना पाणी देणार असल्याचे सांगितले. वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. 
 

Web Title: Representative fails to give water to farmers