पासपोर्टसाठी मदतीला प्रतिनिधी - अनंतकुमार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे - पासपोर्ट मिळविण्यासाठीचा अर्ज भरण्यासाठी कोणाची मदत घ्यायची, असा प्रश्‍न जर तुम्हाला पडला असेल तर आता निश्‍चिंत व्हा. परराष्ट्र व्यवहार खात्याच्या www.passportindia.gov.in  या संकेतस्थळावरून किंवा थेट http://locator.csccloud.in  या लिंकवर क्‍लिक करून, आता तुम्ही तुमच्या नजीकच्या ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ प्रतिनिधीचा नाव व पत्ता मिळवू शकता. या प्रतिनिधीकडून केवळ शंभर रुपये शुल्कात तुम्ही पासपोर्टचा अर्ज भरून घेऊ शकता.

पुणे - पासपोर्ट मिळविण्यासाठीचा अर्ज भरण्यासाठी कोणाची मदत घ्यायची, असा प्रश्‍न जर तुम्हाला पडला असेल तर आता निश्‍चिंत व्हा. परराष्ट्र व्यवहार खात्याच्या www.passportindia.gov.in  या संकेतस्थळावरून किंवा थेट http://locator.csccloud.in  या लिंकवर क्‍लिक करून, आता तुम्ही तुमच्या नजीकच्या ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ प्रतिनिधीचा नाव व पत्ता मिळवू शकता. या प्रतिनिधीकडून केवळ शंभर रुपये शुल्कात तुम्ही पासपोर्टचा अर्ज भरून घेऊ शकता. पासपोर्ट विभागाने अधिकृतपणे या सीएससी प्रतिनिधींची यादी जाहीर केली आहे. 

पासपोर्ट हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. मात्र, अद्यापही देशातील फक्त पाच ते सहा टक्के नागरिकांकडेच पासपोर्ट आहे. पासपोर्ट मिळविण्यातील तांत्रिक प्रक्रिया, किचकट बहुपानी अर्ज आणि तो भरण्यात चूक झाल्यास होणारी गैरसोय व दुष्परिणाम यामुळे नागरिकांच्या मनात काहीशी भीतीच असते. त्यामुळे कोणत्या तरी एजंटमार्फत अर्ज भरून घेण्याची किंवा पासपोर्ट काढण्याची धडपड अनेकजण करतात. या प्रयत्नांतच त्यांची फसवणूक होण्याचे प्रकार घडतात. अशा फसवणुकीच्या प्रकारांना आणि एजंटगिरीला आळा घालण्यासाठी क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी 

अनंतकुमार यांनी सीएससी प्रतिनिधींची मदत घेण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले. त्यानुसार आता अनंतकुमार यांनी सीएससी प्रतिनिधींची अधिकृत यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

अधिकृत ‘सीएससी’ प्रतिनिधी शोधण्यासाठी काय कराल? 
‘पासपोर्ट इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर जा. 
 संकेतस्थळाच्या ‘होम पेज’वर ‘बिफोर यू अप्लाय’ या विभागात ‘लोकेट कॉमन सर्व्हिस सेंटर’चा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्‍लिक करा 
 तुम्हाला http://locator.csccloud.in यावर रिडिरेक्‍ट केले जाईल   फाइंड सीएससी सेंटरमध्ये अपेक्षित माहिती भरा 
 राज्य, जिल्हा, उपजिल्हा यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी प्रत्येकी एकाची निवड करा आणि सर्च बटन क्‍लिक करा 
 सर्च बटन क्‍लिक केल्यावर तुम्हाला त्या उपजिल्ह्यातील अधिकृत सीएससी प्रतिनिधींचे नाव व पत्ता समाविष्ट असलेली यादी दिसेल 

सीएससी लोकेटरमध्ये तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातील सीएससी प्रतिनिधीचे नाव, पत्ता आणि त्याचा सीएससी आयडी दिसतो. काही दिवसांमध्ये या प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांकही संकेतस्थळावर थेट उपलब्ध होणार आहेत. केवळ शंभर रुपये शुल्कात या प्रतिनिधींकडून तुम्हाला पासपोर्टचा अर्ज भरून घेता येईल.
- अनंतकुमार, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, पुणे 

Web Title: Representative to help passport