चीनी वस्तूंची होळी करत 'रिपाइं'कडून चीनचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

'रिपाइं'चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसारपक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कोथरूडमधील कर्वे पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.

पुणे : मोबाईल, खेळणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी चिनी वस्तूंसह ध्वजाची होळी करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) 'रिपाइं'ने चीनने गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. तसेच जगभर पसरलेल्या कोरोना महामारीला चीन जबाबदार असल्याच्या कथित पार्श्वभूमीवरही हे होळी आंदोलन करीत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन 'रिपाइं'ने केले. यावेळी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'रिपाइं'चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसारपक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कोथरूडमधील कर्वे पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून हे आंदोलन झाले. यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी केशव पवळे, बाबासाहेब तुरूंकमारे, जितेश दामोदरे, रेखाताई चव्हाण, उज्जवलाताई सर्वगोड,दस्तगीर शेख,ऍड आनंद कांबळे, शिवाजीराव कांबळे,दीपक सगरे, वसंत ओव्हाळ, प्रमोद दिवाकर, वसंतराव वाघमारे, सुभाष पासोटे, रमेश सोनवणे, सत्येश हिरवे, नवनाथ सोनवणे, अंकुश भोसले, संदीप पौळे, अर्जुन गव्हाणे आदी उपस्थित होते.

लग्नाच्या पूजेनंतर डीजे लावून सुरू होता डान्स, पोलिसांनी काढली अशी वरात

'चिनी वस्तूंवर बहिष्कार घालूया, शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहूया', 'दळभद्र्या चिनी वस्तूंचा धिक्कार असो, चिनी वस्तू वापरणार नाही', 'आम्ही चिनी वस्तू चिनी ऍप वापरणार नाही' अशी शपथ घेत कार्यकर्त्यांनी चीनला धडा शिकवण्याचे आवाहन केंद्र सरकारकडे केले. तसेच चीनच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

बाळासाहेब जानराव, ऍड. मंदार जोशी यांनी 'चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून यापुढे भारतीय नागरिकांनी कोणत्याही प्रकारची चिनी वस्तू वापरू नये किंवा विकू नये, असे आवाहन केले. 

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: republican party of india protest against china by burning chinese products