Pune News : जांभूळवाडी तलाव हस्तांतरण आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या विभाजनास मंजुरी देण्याची अजित पवारांकडे मागणी

जांभूळवाडी तलावाची हस्तांतरणास आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या विभाजनास मंजुरी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
request to ajit pawar to approve transfer of Jambhulwadi lake partition of bharti vidyapeeth police station
request to ajit pawar to approve transfer of Jambhulwadi lake partition of bharti vidyapeeth police stationSakal

कात्रज : जांभूळवाडी तलावाची हस्तांतरणास आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या विभाजनास मंजुरी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी याबाबतीतील निवेदन त्यांना दिले आहे.

जलसंपदा विभागाच्या आणि महापालिकेच्या वेळकाढू वृत्तीमुळे जांभूळवाडी तलाव लालफीतीमध्ये अडकून पडला आहे. त्याची अवस्था गटारापेक्षा वाईट झाल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नुकतेच जलसंपदा विभागाने तलाव पालिकेकडे हस्तांतरण करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे. मात्र, हस्तांतरण प्रक्रियेस विलंब होत आहे. तरी यामध्ये लक्ष घालून तलाव हस्तांतरण प्रक्रियेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न म्हणजे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे विभाजन करून, नवीन आंबेगाव (बु) पोलिस ठाणे निर्माण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याबाबत पुणे शहर पोलीस यांच्यासह पाठपुरावा करून सदर प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून,

केवळ मंत्रीमंडळ मान्यता प्रलंबित आहे. पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी आवश्यक जागाही महापालिकेकडून प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत, लवकरच जागाही ताब्यात मिळेल. शहरात वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेता,

तसेच एकट्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यावरती एकूण ३ पोलिस ठाण्यांएवढा ताण असतो. त्यामुळे दक्षिण पुण्याचा वाढता परिसर विचारात घेता, नवीन आंबेगाव बुद्रुक पोलिस ठाणे होणे तात्काळ गरजेचे आहे, असून त्यासाठीही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com