पुणे : गटारात पडलेल्या गायीची सुटका

pune.jpg
pune.jpg

पुणे : सकाळी पावणे नऊ वाजताची वेळ. येरवड्यातील न्यु एमएस कॉलनीजवळील 10 ते पंधार फुट खोल गटारामध्ये एक गाय पडली. तेथून बाहेर पडण्यासाठी तिने बराचवेळ धडपड केली. मात्र सुटकेचा मार्ग दिसेना. त्यामुळे गायीने मोठमोठ्याने ओरडण्यास सुरूवात केली. स्थानिक नागरिकांनी गायीचा आवाज ऐकून अग्निशामक दल व गोरक्षक कार्यकर्त्यांना कळविले. त्यानंतर अर्ध्या तासातच तिची सुटका करण्यात आली. 

येरवडा येथील लष्करी कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेला एमएस कॉलनी परिसर आहे. तेथील मोकळ्या चरण्यासाठी गेलेली एक गाय उघड्या गटारामध्ये पडली. तेथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करुनही गायीला गटाराबाहेर पडता आले नाही. त्यानंतर जीवाच्या आकांताने गायीने ओरडण्यास सुरूवात केली. हा प्रकार स्थानिक नागरीकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तेथील गोरक्षक कार्यकर्ते व अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली.
 

थोड्या वेळाने दाखल झालेल्या येरवडा अग्निशामक केंद्राच्या जवानांनी प्रभारी अधिकारी सुभाष जाधव व त्यांच्या जवानांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने मोठमोठे दोरखंड गायीभोवती गुंडाळुन तिला गटाराबाहेर काढून तिची सुटका केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com