esakal | भारतात संशोधनातील उदासीनता दूर व्हावी : डॉ. नानासाहेब थोरात यांचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. नानासाहेब थोरात

भारतात संशोधनातील उदासीनता दूर व्हावी : डॉ. नानासाहेब थोरात यांचे मत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रोजगाराभिमुख शिक्षण पद्धतीचा प्रसार करताना उच्च शिक्षणातील गुणवत्ता स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाश्चात्त्य देशातील विद्यापीठांमध्ये संशोधनात्मक वृत्तीचे वातावरण तयार केले जात असून संशोधकांना प्रयोगशाळा उपलब्ध असतात. भारतात संशोधनाबाबत उदासीनता आहे. त्यामुळे संशोधनाला पोषक शैक्षणिक संस्कृती निर्माण झाली पाहिजे, तरच वैज्ञानिक संशोधनाबद्दलची उपेक्षा दूर होईल. संशोधनाबाबत उदासीनता दूर झाली, तरच देशात नोबेल पारितोषिक विजेते संशोधक तयार होतील,’’ असा विश्वास ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: धक्कादायक,जातपंचायतीकडून संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार;पाहा विडिओ

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाद्वारे आयोजित परिसंवादात डॉ. थोरात बोलत होते. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, एमआयटी रिसर्च अँड इनोव्हेशन सेलचे प्रमुख डॉ. वीरेंद्र भोजवानी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कोरोनाच्या तिस-या लाटेची तयारी; पण कंत्राटी मनुष्यबळावर मर्यादा

डॉ. थोरात म्हणाले,‘‘विद्यापीठ हे संशोधनासाठी महत्त्वाची भूमिका निभावत असतात. शिक्षण संस्थांनी केवळ नफा न बघता माणसाच्या कल्याणासाठी संशोधन करावे तसेच संशोधनात्मक वातावरण तयार करावे. विद्यापीठात आणि शिक्षण संस्थेत मल्टीडिसिप्लिनरी  अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजेत.  पाश्चात्त्य देशामध्ये संशोधन आणि संशोधकांना विशेष महत्त्व आहे. तिथे संशोधकांचा पगार, पायाभूत सुविधा, वेळ आणि मनोबल वाढविण्याचे कार्य केले जाते. असे वातावरण भारतातील विद्यापीठ आणि शिक्षण संस्थामध्ये असणे गरजेचे आहे.’’

loading image
go to top