कोरोना माहामारीतून आपण नक्की काय शिकलो? वाचा काय म्हणतायेत शास्त्रज्ञ

research paper on what learned in Corona published in the Indian Journal of Medical Research
research paper on what learned in Corona published in the Indian Journal of Medical Research

पुणे : कोरोनासारखी जागतिक साथ आणि सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने देशात एक हजार वैद्यकीय प्रयोगशाळांची आवश्‍यकता आहे. कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यात एक तरी प्रयोगशाळा असणे अनिवार्य असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनातून आपण कोणता धडा घेतला, याचे अभ्यास करणारा शोधनिबंध नुकताच "इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च'मध्ये प्रकाशित झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्गजन्य आजार विभागाचे दक्षिण आशियाचे माजी संचालक डॉ. राजेश भाटिया आणि राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या संचालक डॉ.प्रिया अब्राहम यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेंव्हा देशात फक्त पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत निदान करणे शक्‍य होते. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार सरकारी आणि खासगी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहे. पण भविष्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी प्रयोगशाळांची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञ म्हणाले. 



...तर हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करा; उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश​

ज्येष्ठांकडे हवे विशेष लक्ष 
देशातील 9.3 टक्के लोकसंख्या ही 60 ते 79 वयातील आहे. त्यामुळे साथीच्या काळात त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे अत्यवस्थ आणि मृत रुग्णांमध्ये 69 वर्षांपुढील 51.2 टक्के रुग्ण होते. तर 34.8 टक्के रुग्ण हे 45 ते 60 वयोगटातील होते. 
 
इतर आजारांच्या उपचारासाठी हवी व्यवस्था  
साथींच्या काळात इतर आजारांच्या उपचारासाठी असलेली यंत्रणा कोलमडते किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होते. असे न करता त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि पुरेशी यंत्रणा उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि सेवांचे उत्पादन आणि वितरणासाठी सक्षम यंत्रणेची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे बाधित रुग्णाचा शोध घेणे आणि उपचार देणे शक्‍य होते. 

पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!​


स्थलांतरितांची व्यवस्था हवी 
परदेशातील आणि देशातील स्थलांतरितांचे व्यवस्थापन, निदान आणि उपचाराची योग्य काळजी घेण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. लक्षण न दिसणाऱ्या रुग्णांच्या माध्यमातून कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेता याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 

कोरोना प्रसाराचे गणितीय मॉडेल आणि पुराव्यांच्या आधारावर अधिक सक्षम रणनीती महत्त्वपूर्ण आहे. मानवी बुूद्धीमत्तेपेक्षा कोराना विषाणूची जनुके अधिक चाणाक्ष असून, त्याच्या विरुद्ध सरकार, वैद्यकीय कर्मचारी, प्रशासन, शास्त्रज्ञ आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नातूनच यश प्राप्त करता येईल. 
- डॉ. प्रिया अब्राहम, संचालक, राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com