पुणे जिल्ह्यातील सुमारे ७५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण कधी?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

पुणे जिल्ह्यातील सुमारे ७५० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण काढण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यास येत्या २१ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. मात्र, सरपंचपदाची आरक्षणे निश्‍चित झालेली नाहीत. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

शेटफळगढे - जिल्ह्यातील सुमारे ७५० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण काढण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यास येत्या २१ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. मात्र, सरपंचपदाची आरक्षणे निश्‍चित झालेली नाहीत. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्यातील येत्या जुलै ते डिसेंबर २० या कालावधीत मुदत संपत असलेल्या ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका व प्रभाग रचना आरक्षण कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयोगाच्या २९ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशानुसार सुरू झाली आहे. यानुसार ४ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

चाकणमध्ये कांदा २० रुपये किलो

यावर येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत ग्रामस्थांना हरकती दाखल करता येणार आहेत. त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी पूर्ण केली जाणार आहे. तसेच, उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाठविलेले सुनावणीचे प्रस्ताव तपासून येत्या १७ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने या प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. 

चऱ्होली ते विमानतळ रस्त्यासाठी ३६ कोटी

या प्रक्रियेत सर्वांत महत्त्व असलेल्या सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून होणार नाही, हे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, प्रभागनिहाय आरक्षणापूर्वी सरपंचपदाची आरक्षण निघणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रभागनिहाय आरक्षणानंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा कार्यक्रम सध्या प्रशासनाने चालवलेला आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होईपर्यंत इच्छुकांमध्ये संभ्रम राहणार आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ सरपंचपदाची आरक्षणे जाहीर करणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation of Sarpanch post of about 750 grampanchayats in Pune district