जुन्नरला तनिष्कांसह शंभर महिलांचा अवदानाचा संकल्प

जुन्नरला तनिष्कांसह शंभर महिलांचा अवदानाचा संकल्प
जुन्नरला तनिष्कांसह शंभर महिलांचा अवदानाचा संकल्प

जुन्नर : जुन्नर व बारव-पाडळी तनिष्का गटासह शंभर महिलांनी अवयवदानाचा संकल्प केला. संक्रांतीच्या तिळगुळ समारंभाच्या निमित्ताने पाडळी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात शंभर महिलांनी फॉर्म घेतले तर ५५ महिलांनी लगेचच फॉर्म भरून दिले.

जुन्नर जवळील बारव-पाडळी तनिष्का गट व पाडळी महिला बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने संक्रातीचे हळदीकुंकू व तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अवयव दान हेच श्रेष्ठ दान हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती गटप्रमुख उज्वला शेवाळे यांनी दिली. डॉ. राजश्री इंगवले यांनी महिलांना अवयव दानाचे महत्व याविषयी माहिती दिली. पुष्पा बुट्टे पाटिल, अदिती सदाकाळ, मनिषा लोखंडे, स्वाती कबाडी, सोनाली लोखंडे, नंदा सोनवणे, आशा केदारी, कांता मस्करे, सिमा पापडे, सुनीता कबाडी, रेखा कबाडी, उज्वला पापडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सरपंच संतोष केदारी, उपसरपंच अरूण पापडे यांचे सहकार्य लाभले. यापवेळी नगरसेविका अंकिता गोसावी, अश्विनी गवळी, पाडळी बचत गटाच्या महिला व जुन्नर शहर तनिष्का सदस्या उपस्थित होत्या. अवयवदानाचा फॉर्म भरावयाचा असेल त्यांनी 8180816366 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com