BharatBandh : देशव्यापी बंदला बारामतीत संमिश्र प्रतिसाद

baramati
baramati

बारामती शहर - इंधन दरवाढीविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या देशव्यापी बंदला आज बारामतीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापा-यांनी आपले व्यवहार आज बंदची हाक असूनही सुरु ठेवले होते, व्यापा-यांच्या तीव्र भावना विचारात घेता नाराजी पत्करायला नको या मुळे राजकीय पक्षांनीही कोणावरही बंदसाठी दबाव न आणल्याने आज शहरात बंद शांततेत पार पडला. 

गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलसह गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या भरमसाठ वाढीच्या विरोधात कॉंग्रेसने देशव्यापी बंदचे आयोजन केले होते, काल राष्ट्रवादीनेही या बंदला पाठिंबा दिला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांनीही या बंदला पाठिंबा असल्याचे जाहिर करत भिगवण चौकात दरवाढीविरोधात निदर्शने केली. 

मात्र आज सोमवारचा दिवस असल्याने व दोन दिवसांची सलग सुटी झाल्याने आज अनेक व्यापा-यांनी दुकाने बंद न ठेवण्याचे ठरविले. दुसरीकडे काहींनी धोका पत्करायला नको या भावनेने दुकाने बंद ठेवली, त्या मुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील एसटी सेवा आज सुरळीत सुरु होती, कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु होत्या. 

दरम्यान राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी आज प्रशासनास निवेदन देत इंधन दरवाढीचा तीव्र निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com