#MilkAgitation आंबेगाव तालुक्यात दुध आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 16 जुलै 2018

मंचर (पुणे) : दुध दरवाढीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला आंबेगाव तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोवर्धन दुध प्रकल्पालाही आंदोलनाचा फटका बसला आहे.

दररोज राज्याच्या विविध भागातून बारा लाख लिटर दुधाचे संकलन अवसरी फाटा-मंचर येथील गोवर्धन दुध प्रकल्पात केले जाते. आंदोलनामुळे वीस टक्केही दुध संकलन झाले नाही. त्यामुळे पुणे, मुंबई, नागपूर येथे दुधाचे टॅकर पाठविण्यात आले नाहीत, असे गोवर्धन दुध प्रकल्पातून सांगण्यात आले.    

पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथील दुध उत्पादकांनी श्रीराम दुध उत्पादक संस्थेला दुध पाठविले नाही. शेतकरी नवनाथ पोखरकर यांनी दुध संस्थेसमोर दुध ओतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला.

आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक वीस हजार लिटर दुध उत्पादन पिंपळगाव येथे दररोज केले जाते. सोमवारी (ता. १६) गवळ्यानी दुध घरीच ठेवणे पसंत केले. अवसरी फाटा येथे पुणे जिल्हा सहकारी दुध संघामार्फत (कात्रज डेअरी) अवसरी दुध शीतकरण केंद्रात दररोज ४० गावातून २५ हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. पण आज मात्र फक्त तीन हजार लिटर दुध संकलन झाले. त्यामुळे आज कात्रज डेअरी पुणे येथे दुधाचे टॅकर पाठवता आले नाही, असे व्यवस्थापक अशोक जाधव यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून येथे पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पोंदेवाडी येथेही दुध संकलन झाले नाही, असे खरेदी -विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी सांगितले. अवसरी खुर्द, गावडेवाडी, शेवाळवाडी, चांडोली खुर्द येथील दुध संकलनावरही परिणाम झाला.

हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रमाणे आंदोलन करणार : प्रभाकर बांगर
शेतकरी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दूध आंदोलनाची पुणे जिल्ह्यात जोरदार तयारी केली होती. दूध आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून सोमवारी (ता. १६) सकाळी मंचर पोलिसांनी त्यांना अटक केली. इतरही नऊ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण त्यांना संध्याकाळी सोडून देण्यात आले. 'घराबाहेर मी पडलो नाही, आंदोलन न करताही भाजप-शिवसेना सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली आहे. जामिनावर माझी मुक्तता झाल्यानंतर दुधाच्या टँकरसमोर झोपून हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रमाणे आंदोलन करणार आहे.' असा इशारा बांगर यांनी दिला आहे. ते म्हणाले, 'दुध उत्पादकांची राज्य सरकारने वेळोवेळी फसवणूक केली आहे. माझ्या विरोधात दाखल केलेली कारवाई चुकीची आहे.'

Web Title: response to milk agitation in Ambegaon taluka