मॉरिशसमधील मराठी कलाकारांच्या नाटकाला प्रतिसाद

मिलिंद संधान
शनिवार, 31 मार्च 2018

नवी सांगवी (पुणे): इंग्रज राजवटीत दीडशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातून मॉरिशसला गेलेले मराठी बांधव मॉरिशसवासी झाले, परंतु आपल्या जन्मभू्मिची नाळ त्यांनी तोडली नाही. मॉरिशसच्या मातीशी एकरूप झाले परंतु मराठी भाषा, मराठी सण, मराठी संस्कृती आजही त्यांनी जपून ठेवली आहे. मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सोना घूर्मे यांनी लिहलेल्या 'हा जावई' या नाटीकेतील मराठी उपकारी सभा, मॉरिशस या संस्थेचे 2017 सालच्या नाट्य स्पर्धेतील विजयी कलाकार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेत. शुक्रवारी (ता.

नवी सांगवी (पुणे): इंग्रज राजवटीत दीडशे वर्षापुर्वी महाराष्ट्रातून मॉरिशसला गेलेले मराठी बांधव मॉरिशसवासी झाले, परंतु आपल्या जन्मभू्मिची नाळ त्यांनी तोडली नाही. मॉरिशसच्या मातीशी एकरूप झाले परंतु मराठी भाषा, मराठी सण, मराठी संस्कृती आजही त्यांनी जपून ठेवली आहे. मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सोना घूर्मे यांनी लिहलेल्या 'हा जावई' या नाटीकेतील मराठी उपकारी सभा, मॉरिशस या संस्थेचे 2017 सालच्या नाट्य स्पर्धेतील विजयी कलाकार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेत. शुक्रवारी (ता. 30) त्यांनी त्यांच्या नाटकाचा प्रयोग पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहात खास पिंपरी चिंचवड वासीयांसाठी सादर केला. हाऊस फुल गर्दी करून आपल्या रसिकांनीही भरभरून दाद दिली.

1977 साला पासून मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने मराठी नाटक महोत्सव स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. याच धर्तीवर या कलाकारांचे पथक बारा दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून एकून आठ प्रयोग ते निशुल्क सादर करणार आहेत. पहिला प्रयोग त्यांनी औरंगाबाद येथे केल्यानंतर दुसरा काल पिंपळे गुरव येथे झाला. शेवटचा प्रयोग पन्हाळा गडावर 6 एप्रिलला होणार आहे.

उत्तेकर, सावंत, जगताप, राणे, कदम, भोसले हे मुळचे कोकण रहिवासी असलेल्या या मराठी बांधवांच्या पुर्वजांना सन 1835 ते 1919 या वर्षात ब्रिटिशांनी 20 दिवसांच्या समुद्र प्रवासातून मॉरिशसला कामगार म्हणून आणले. येताना त्यांनी रामायण, भगवतगीता, ज्ञानेश्वरी असे धार्मिक ग्रंथही आणले. आजही ते त्यांची वंशावळ गुढीपाडवा, गणपती, महाराष्ट्र दिन, शिवजयंती, दिवाळी सारखे सण साजरे करतात.

मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पुतलाजी म्हणाले, 'आज मॉरिशसमध्ये मराठी बांधव वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा, अभिनय, राजकारण आणि प्रशासन सेवेत काम करत गर्वाने स्वतःच्या पायावर उभे आहेत. मॉरिशसच्या विकासाठी आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे आहे.'

डिवाइन कॉज सोशल फाऊंडेशन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्राचे आयोजन करण्यात आले होते. डॉ प्रिती व्हिक्टर, वैष्णवी वाटवे, भाजपा चित्रपट आघाडीचे केतन लुंकड यांचे प्रयत्नांमुळे यशस्वी झाला. आमदार लक्ष्मण जगताप, एकनाथ पवार, रामकृष्ण राणे यावेळी उपस्थित होते.

Web Title: response to the play of Marathi drama Mauritius artists