कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये केला बदल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

पुणे शहरासह उपनगरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बदल केला आहे. कोंढवा, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, वडगाव शेरी या भागांतील काही क्षेत्रे नव्याने प्रतिबंधित केली आहेत. नव्या प्रतिबंधित क्षेत्रांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

पुणे - पुणे शहरासह उपनगरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बदल केला आहे. कोंढवा, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, वडगाव शेरी या भागांतील काही क्षेत्रे नव्याने प्रतिबंधित केली आहेत. नव्या प्रतिबंधित क्षेत्रांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज नव्याने ७१ प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून हडपसर, कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, नगर रस्ता आदी उपनगरांच्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. याच कारणांसाठी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार या भागांमध्ये महापालिकेने काही निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वीचे कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, पर्वती, लक्ष्मीनगर, गुरुवार पेठ, महात्मा फुले, घोरपडी पेठ, वारजे, कर्वेनगर, कोथरूड, बावधन, औंध, बाणेर परिसरातील पूर्वीचा भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कायम आहे.

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

दररोज दीडशे रुग्णांची भर 
प्रतिबंधित क्षेत्रातील धनकवडी-सहकार, हडपसर-मुंढवा, वारजे-कर्वेनगर, सिंहगड रोड आदी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत दररोज १५० ते २७८ नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे या ठिकाणी धोका वाढला आहे. या ठिकाणी मास्क घालणे, सायंकाळी सातनंतर दुकाने बंद, ज्येष्ठ, लहान मुलांनी घराबाहेर पडू नये, असे नियम लागू आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: restricted areas changes in pune by corona virus increase