ससून हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करत असताना आला निकाल....

Dr-Pradip-Dubal
Dr-Pradip-Dubal

पुणे - आपण आपली वाट चालत राहिली तर अपयश हे पाठीमागे जाऊन यश पुढे येते. हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये शेवटच्या प्रयत्नात आज 648 वा रँक मिळवून पास  झालेले डॉ. प्रदीप हणमंत डुबल याच्या प्रवासाकडे पाहून कळते. विशेष म्हणजे ज्यावेळी आयोगाचा निकाल आला त्यावेळी ससून हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांची प्रदीप सेवा करत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रदीप यांचं मूळ गाव बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली येथील पुढे शिक्षणासाठी पुणे येथील बी. जे. महाविद्यालयात आपलं MBBS वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षणाची आवड असली तरी प्रशासकीय सेवेत येऊन आणखी आपल्याला समाजासाठी काम करता येईल हा विचार करून प्रदीप यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देण्यास सुरुवात केली. आणि येथेच प्रवास सुरु झाला संघर्षाचा. सुरवातीच्या काळात जरी पूर्ण वेळ अभ्यास केला असला तरी हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे मनात ठाम असल्याने त्यांनी हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले. त्याचबरोबर वेळ मिळेल तसा अकॅडमी मध्येही मुलांना शिकवत असत.

घरची परिस्थिती अतिशय सामान्य. घरी थोडीफार शेती आणि वडील कारखान्यात काम करतात. त्यामुळेच जर आपणाला दिवस बदलायचे असतील तर मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्याला घडवलं पाहिजे. व ही ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे. हे आई-वडिलांनी हेरले आणि पाहिजे ते शिक्षण घेण्यास व या प्रवासात कोठेही कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली. यामुळेच प्रदीप शेवटच्या आणि सहाव्या प्रयत्नात यशस्वी झाले.

सकाळशी बोलताना माझ्या यशाचे सर्व श्रेय हे माझ्या आई-वडिलांना जातं. कारण प्रत्येक क्षणी आज साकार झालेले स्वप्न हे त्यांनी पाहिलं होतं. मला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासू दिली नाही. जे करायचं ते मनमोकळेपणाने मला करण्यास स्वतंत्र दिल. अजून आई-वडिलांनी काय केले पाहिजे. त्यामुळे आई-वडीलच माझ्या यशाचे श्रेयदार आहेत. अशा भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बी प्लॅन तयार असल्याशिवाय यामध्ये उतरू नये. अभ्यास करण्याच्या आधी दुसरा पर्याय निवडून ठेवणे आणि मगच अभ्यासाला लागने हेच सूत्र विद्यार्थ्यांच्या फायद्याचे ठरेल असा  विद्यार्थ्यांना सल्ला दिला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com