दिलासादायक : पुण्यातील मार्केट यार्डात आजपासून किरकोळ भाजी विक्री सुरू
मार्केट यार्ड - कोरोनामुळे मार्केट यार्डात दोन महिन्यांपासून किरकोळ भाजी विक्री बंद होती, ती रविवारपासून (ता. १४) पुन्हा सुरू होत आहे. यामुळे किरकोळ बाजारात वाढलेले भाज्यांचे भाव आटोक्यात येण्यास मदत होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
किरकोळ बाजार सुरू करण्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष मनोज पवार आणि सरचिटणीस हनुमंत बहिरट यांनी बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांना दिले होते. बाजार समिती प्रशासन आणि किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये भाजी विक्री पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली.
हडपसरचे मार्केट आजपासून सुरू
हडपसर : लॉकडाउनमुळे बंद असलेले पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मार्केट रविवारपासून (ता. १४) सकाळी ९ ते ४ या कालावधीत सुरू होणार आहे. आमदार चेतन तुपे यांनी शेतकरी व व्यापारी यांची सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बैठक घेतली. पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भिसे, पंडित जवाहरलाल नेहरू व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद बडदे, नगरसेवक मारुती तुपे, योगेश ससाणे, उज्ज्वला जंगले, सुनील बनकर, बाळासाहेब साबळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.