

विरोधी पक्षनेते म्हणून
ऋतब्रत बॅनर्जीच कायम
कोलकता उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश
कोलकता, ता. १८ (पीटीआय) : तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी हेच पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कायम राहतील, असा अंतरिम आदेश कोलकता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मंगळवारी दिला. बॅनर्जी यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्या. शम्पा सरकार आणि न्या. अजयकुमार गुप्ता यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी गटातील आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या प्रकरणाची सुनावणी करून दोन महिन्यांत निकाल देण्याचे निर्देश खंडपीठाने एकल पीठाला दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. या निर्णयाला स्थगिती देण्यास एकल पीठाने १८ जून रोजी नकार दिला होता. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ नेते चट्टोपाध्याय यांनी खंडपीठात धाव घेतली होती. स्वतःचे नाव नाकारून बॅनर्जी यांची नियुक्ती केल्याच्या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.