Pune News : लष्करातील निवृत्त सुभेदाराला सायबर चोरट्यांनी घातला एक कोटींचा गंडा

निवृत्त सुभेदाराने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने एक कोटी दहा लाख रुपये जमा केले
CYBER CRIME
CYBER CRIMESAKAL

पुणे : सोशल मीडियावरील जाहिराती आणि व्हिडिओला लार्इक्स मिळवून देण्याच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाने लष्करातून निवृत्त झालेल्या सुभेदाराला सायबर चोरट्यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा गंडा घातला. निवृत्त सुभेदाराने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने एक कोटी दहा लाख रुपये जमा केले आहेत.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुबेदाराने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी पाच बँकेतील १२ खात्यात पैसे जमा करून घेतले असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी निवृत्त सुभेदारास संदेश मेसेज पाठवत सोशल मीडियावरील जाहिराती आणि व्हिडिओला लार्इक्स मिळवून दिल्यास त्यात मोठा नफा मिळेल, अशी माहिती दिली.

प्रत्येक दर्शक पसंतीला पैसे मिळतील. तर या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दहा ते वीस टक्के नफा मिळेल, असे आमिष त्यांनी दाखवले. त्यानुसार सुरवातीला चोरट्यांनी तक्रारदार सुभेदारास काही पैसे देखील दिले. त्यामुळे तक्रारदार सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडले व त्यांनी गुतंवणूक करण्याची तयारी दर्शवली.

त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. तुम्हाला दिलेले उद्दिष्ट साध्य केल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचे चोरट्यांनी सांगितले. त्यामुळे निवृत्त सुभेदाराने चोरट्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने ऑनलाइन पद्धतीने एक कोटी दहा लाख रुपये जमा केले. त्यासाठी त्यांनी नातेवाईकांकडून देखील काही रक्कम घेतली होती. मात्र चोरट्यांनी कोणताही परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com