'राजकीय व्यवस्थेचे दुर्लक्ष होत असेल तर...'; काय म्हणाले राज्य सरकारचे निवृत्त प्रधान सचिव?

Mahesh_Zagade
Mahesh_Zagade

पुणे : "महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि त्यामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रिया याकडे राजकीय व्यवस्थेचे दुर्लक्ष होत असेल, तर 'हा पांगुळगाडा आपण किती दिवस चालविणार आहोत? असे प्रशासकीय व्यवस्थेने राजकीय व्यवस्थेला सांगितले पाहिजे," असे मत राज्य सरकारचे निवृत्त प्रधान सचिव महेश झगडे यांनी व्यक्त केले.

एमपीएससी स्टुडंटस् राइटस् यांच्या वतीने 'सध्याची प्रशासकीय यंत्रणा आणि अधिकारी कसा असावा' विषयावर झगडे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "राज्य लोकसेवा आयोगाची व्याप्ती वाढवली पाहिजे. तसेच प्रशासकीय यंत्रणेतील पद भरली जात नसतील, गरज असताना पदांची संख्या वाढवली जात नसेल, तर ते कुचकामी आहेत, हे सांगितले पाहिजे."

"राजकीय यंत्रणेबरोबरच प्रशासकीय यंत्रणा सुदृढ असणे गरजेचे आहे. 'आम्हाला राजकीय नेतृत्त्व काम करू देत नाही,' असे काहीवेळा प्रशासकीय अधिकारी सांगतात. परंतु अधिकाऱ्यांना कायद्याने हक्क तसेच संरक्षण दिले आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांनी सचोटीने काम केले पाहिजे."

प्रशासकिय अधिकारी असा असावा :
- स्वतः सचोटीने काम करणारा
- वेळेत काम पूर्ण करेल, विंलब न करणारा
- निपक्षपातीपणे काम करणारा
- अधिकाऱ्यांकडे असणाऱ्या कवच कुंडलांचा वापर करणारा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com