जुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी

दत्ता म्हसकर
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

जुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळाल्यानंतर त्यांची नियमित औषधे आणावी लागतात कारण पैसे नाहीत तर औषधे कशी आणायची असा प्रश्न त्यांना पडतो. याबरोबर अनेक कौंटूंबिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

गेल्या दहा महिन्यापासून दरमहाचे निवृत्ती वेतन वेळेवर होत नाही. काही वेळेस दोन-दोन महिने वेतन होत नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे विचारणा केली तर आम्ही वेळेवर अनुदान पाठवतो असे ते सांगतात, मग आम्हा सेवा निवृत्तधारकांना आमचे हक्काचे निवृत्ती वेतन नियमितपणे का मिळत नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवृत्ती वेतन मिळण्यात अनियमितता होत असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनाही सांगण्यात आले. 

जुन्नर नगर परिषद शिक्षण मंडळाचे 38 नियमित निवृत्ती वेतनधारक शिक्षक, दोन कार्यालयीन निवृत्ती वेतनधारक कर्मचारी व 14 कुटुंब निवृत्ती वेतनधारक असे एकूण 54 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतन नियमित मिळत नसल्याची तक्रार आहे. अनुदान वेळेत येत असेल तर निवृत्ती वेतन वेळेत का होत नाही ? असा प्रश्नही उपस्थित केला जात असून याला कोण जबाबदार असेल त्यांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. गेल्या काही महिन्यापासून शिक्षण मंडळास पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नसल्याचे समजते.

Web Title: retired teacher staff's demand for regular salary per month