

Exemplary Patriotism: 84-Year-Old Retired Teacher Donates ₹1 Crore for Soldiers' Welfare
Sakal
पुणे : सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती केवळ प्रेम किंवा सद्भावना न बाळगता, त्यांच्यासाठी प्रत्यक्ष कृती करून दाखवणाऱ्या व्यक्ती समाजात दुर्मिळ असतात. मात्र, वयाच्या ८४ व्या वर्षी एका सेवानिवृत्त शिक्षिकेने पेन्शन आणि आयुष्यभराच्या बचतीतून जमा केलेली एक कोटी रुपयांची रक्कम राष्ट्रसेवेसाठी अर्पण केली आहे. सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेल्या विजया हरी वैद्य यांनी समाजऋण फेडण्याच्या उद्देशाने ही देणगी पुण्यात विविध लष्करी कल्याणकारी संस्थांना सुपूर्द केली.