वेळेत ताबा न दिल्याने दुकानासाठी भरलेली रक्कम व्याजासह परत करा; महारेराचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharera
वेळेत ताबा न दिल्याने दुकानासाठी भरलेली रक्कम व्याजासह परत करा; महारेराचा आदेश

वेळेत ताबा न दिल्याने दुकानासाठी भरलेली रक्कम व्याजासह परत करा; महारेराचा आदेश

पुणे - करारनाम्यानुसार ठरलेल्या वेळेत दुकानाचा ताबा (Shop Possession) न दिल्याने ग्राहकाने (Customer) भरलेली रक्कम (Amount) व्याजासह परत (Return) करावी, असा आदेश महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) (Maharera) विकसकाला दिला आहे. महारेराचे सदस्य डॉ. विजय सतबीर सिंग यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणी सुजाता व संकेत ठाकूर यांनी भुजबळ ब्रदर्स कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात महारेराकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांतर्फे ॲड. सुदीप केंजळकर यांनी बाजू मांडली. तक्रारदारांनी विकसकाच्या हडपसर येथील मिस्टी ट्रेल्स प्रकल्पात १६७.८१ चौरस फुटाचे दुकान १८ लाख ८९ हजार रुपयांना खरेदी केले होते. डिसेंबर २०१४ मध्ये या व्यवहाराचा नोंदणीकृत करारनामा करण्यात आला. या करारनामा तारखेपासून २४ महिन्यांत दुकानाचा ताबा मिळणे अपेक्षित होते. मात्र, विकसकाने दुकानाचा ताबा देण्यास खूप उशीर केला, तसेच बांधकामही पूर्ण केले नाही, असा आरोप करत तक्रारदारांनी महारेराकडे दाद मागितली होती.

हेही वाचा: पुणे : मुलावर ओरडली म्हणून पत्नीला पायरीवरून ढकलले

विकसकाने लेखी बाजू मांडत तक्रारदारांचे आरोप फेटाळले. प्रकल्पाचे कामकाज सुरू असताना कंपनीच्या दोन्ही भागीदारांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे प्रकल्पाचे कामकाज रखडले. ताबा देण्यास विलंब झाल्याने ग्राहकाला व्याजासहित भरपाई द्यावी लागल्यास कंपनीचे अपरिमित नुकसान होऊन, प्रकल्पाचे बांधकाम बंद करावे लागेल. त्यामुळे ही तक्रार फेटाळण्याची विनंती विकसकाने केली.

विकसकाला बाजारपेठेतील जोखमीची पूर्ण कल्पना असते :

विलंबाची कारणे तक्रारदाराला कळविल्याचा पुरावा विकसकाने सादर केलेला नाही. त्यामुळे विकसकाने रेरा कायद्यातील कलम १८ चे उल्लंघन केले आहे. तसेच विकसकाला बांधकाम प्रकल्प सुरू करताना आणि ग्राहकांशी करारनामा करताना बाजारपेठेतील जोखमीची पूर्ण कल्पना असते. ठरलेल्या कालावधीनंतर कंपनीच्या भागीदारांचा मृत्यू झाला आहे, असे निकाल नमूद आहे.

Web Title: Return Amount Paid Shop With Interest Non Possession In Time Order Of Maharera

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top