Monsoon Return: पश्‍चिम राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु; हवामान विभागाची माहिती

यंदा २५ सप्टेंबरला मॉन्सूनने माघार फिरण्यास सुरवात केली
return journey of Monsoon from West Rajasthan weather update
return journey of Monsoon from West Rajasthan weather updatesakal

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनने आता परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. सोमवारी (ता. २५) पश्‍चिम राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीच्या परतीची वाटचाल सुरू झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले आहे.

मॉन्सूनच्या आगमनाला जसा उशीर झाला त्याचप्रमाणे त्याच्या परतीचा प्रवास ही यंदा लांबला. सर्वसाधारण तारखा पाहता मॉन्सूनच्या परतीचा प्रवास हा १७ सप्टेंबरपासून राजस्थानमधून सुरू होतो. मात्र यंदा २५ सप्टेंबरला मॉन्सूनने माघार फिरण्यास सुरवात केली आहे.

त्यामुळे सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मॉन्सून माघार घेत आहे. या वर्षी संपूर्ण देशाला व्यापल्यानंतर मॉन्सूनने २ महिने आणि २३ दिवसांचा मुक्काम केला आहे. तर आता नौखरा, जोधपूर, बारमेर या भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.

मागील काही वर्षांमध्ये मॉन्सूनच्या माघारी फिरण्याला विलंब झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी ही २० सप्टेंबर दरम्यान मॉन्सूनने राजस्थान मधून माघारी फिरण्यास सुरवात केली होती. महाराष्ट्राची स्थिती पाहता साधारणपणे ५ ऑक्टोबरपासून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होते.

त्यामुळे मॉन्सून आपल्या नियोजित विळेत राज्यातून माघे फिरेल का याकडे लक्ष आहे. यंदा मॉन्सूनने राज्यात ही आगमनास विलंब केला होता. मॉन्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता, तर २५ जून रोजी त्यांने संपूर्ण महाराष्ट्र व्यापले होते.

return journey of Monsoon from West Rajasthan weather update
Monsoon Update : मान्सून अतिसक्रिय! राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाची माहिती

मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती बाबत माहिती देताना हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी म्हणाले, ‘‘सध्या नैर्ऋत्य राजस्थानच्या भागात आर्द्रता कमी झाली असून कोरड्या हवामानाची स्थिती आहे. त्यात मागील पाच दिवसांपासून येथे पावसाची उघडीप कायम आहे. अशा या सर्व हवामानाच्या स्थितीमुळे मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.’’

मागील तीन वर्षांतील मॉन्सूनच्या परतीचा प्रवास

वर्ष - तारीख

२०२१ - ६ ऑक्टोबर

२०२२ -२० सप्टेंबर

२०२३ - २५ सप्टेंबर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com