नृत्यातून उलगडला सांस्कृतिक वारसा

dance
dance

पुणे : वैविध्यपूर्ण नृत्याविष्कार, विविध राज्यांच्या कलेची विविधता, शास्त्रीय नृत्य आणि गीतांवर रंगलेल्या नृत्यशैलीचा मिलाफ अन् देशभरातील कलाकारांनी नृत्यातुन सादर केलेली त्या त्या राज्याची संस्कृती आदी नृत्यविष्काराने भारत सिझन महोत्सव रंगला, नृत्यगुरू राजसी वाघ हिने सादर केलेल्या भरतनाट्यमला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, देशभरातील कलाकारांनी पारंपरिक वेशभूषेत आपापल्या राज्याची  संस्कृती आणि परंपरा नृत्यातुन सादर केली अन रसिकांची मने जिंकली, या दहा दिवसीय  बहुभाषिक नृत्य, नाट्य, गायन व वादन महोत्सवात सुमारे 22 राज्यातील आठ हजार आपली कला सादर करीत आहेत.

यावेळी संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ, सचिव हेमंत वाघ, कार्याध्यक्ष प्रा, श्याम भुरके, मुकुंद नगरकर , संजय भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मणिपुरी, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम आशा विविध नृत्य प्रकारचा एकाच व्यासपीठावर झालेला संगम आणि पारंपरिक नृत्याबरोबरच विविध गीतांवर थिरकणारी तरुणाईची पाऊले असा अनोखा कलाविष्कार पुणेकर रसिकांना अनुभवता आला.

हा महोत्सव शनिवारपर्यंत 1 जून सकाळी नऊ ते रात्री बारा या वेळेत टिळक स्मारक मंदिर येथे सर्वांसाठी खुला आहे, स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान बालगधर्व रंगमंदिर येथे 1 जुन रोजी सकाळी नऊ वाजता अस्मिता आणि ती फुलराणी या मालिकेतील  सुप्रसिद्ध कलाकार मयुरी वाघ यांच्या हस्ते होणार असल्याचे हेमंत वाघ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com