सीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) सुधारित वेळापत्रक "सीईटी सेल'ने आज (मंगळवारी) जाहीर केले आहे. यामध्ये तंत्रशिक्षणाच्या चार आणि उच्च शिक्षण विभागाच्या आठ परीक्षांचा समावेश आहे.

पुणे - लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) सुधारित वेळापत्रक "सीईटी सेल'ने आज (मंगळवारी) जाहीर केले आहे. यामध्ये तंत्रशिक्षणाच्या चार आणि उच्च शिक्षण विभागाच्या आठ परीक्षांचा समावेश आहे. तीन ऑक्‍टोबरपासून सीईटीची परीक्षा सुरू होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सीईटी परीक्षा सुरक्षित नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राची माहिती, रिपोर्टिंग टाइम, परीक्षा सुरू होण्याची वेळ आदींबाबतची माहिती हॉल तिकिटावर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावरील सुरक्षित नियमांची माहिती देखील हॉल तिकिटावर प्रकाशित करण्यात येईल. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. तीन वर्षीय एलएलबी आणि बीएड या अभ्यासक्रमांच्या सीईटीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे "सीईटी सेल'ने स्पष्ट केले आहे. प्रवेश परीक्षांची अधिक माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उच्चशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा
अभ्यासक्रम : सीईटी परीक्षा दिनांक
एमपीएड - 3 ऑक्‍टोबर
एमएड - 3 ऑक्‍टोबर
बीएड/एमएड सीईटी - 10 ऑक्‍टोबर
एलएलबी ( पाच वर्षे) - 11 ऑक्‍टोबर
बीपीएड - 11 ऑक्‍टोबर
बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड - 11 ऑक्‍टोबर

तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी
अभ्यासक्रम - सीईटी परीक्षा दिनांक

एम-आर्च सीईटी - 3 ऑक्‍टोबर
एम- एचएमसीटी - 3 ऑक्‍टोबर
एमसीए - 10 ऑक्‍टोबर
बी-एचएमसीटी - 10 ऑक्‍टोबर

हेही वाचा : ओबीसी आरक्षणात मराठा आरक्षणाला घुसवू नका; वाचा, कोण म्हणाले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revised schedule of State Common Entrance Tests has been announced by the CET Cell on Tuesday