पुण्यात स्टेशनरी व पुस्तकविक्रीला पुन्हा उभारी

शनिवार पेठ - लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे शालेय साहित्याची खरेदी करताना ग्राहक. यावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली.
शनिवार पेठ - लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे शालेय साहित्याची खरेदी करताना ग्राहक. यावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली.

पुणे - शैक्षणिक साहित्याचे बदलते स्वरूप तसेच मोबाईल आणि टॅब यांचा वाढता हस्तक्षेप, यामुळे आधीच बदलाला सामोरे जाणारा स्टेशनरी आणि पुस्तक व्यवसाय लॉकडाउनमध्ये अधिकच कचाट्यात सापडला होता. पण ऑनलाईन पद्धतीने सुरु झालेलं शिक्षण आणि जाणत्या ग्राहकांच्या जोरावर स्टेशनरी व पुस्तक विक्रीचा व्यवसाय पुन्हा उभा राहत आहे.

एकविसाव्या शतकात ग्राहकांच्या गरजांचे बदलते स्वरूप आत्मसात करत असतानाच, कोरोनामुळे एका मोठ्या स्थित्यंतराचा सामना हा व्यवसाय करत आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यामुळे ग्राहकांची पावले पुन्हा खरेदीकडे वळाली आहेत. मात्र, आता या खरेदीचे स्वरूप ऑनलाईन आणि कुरियर पद्धतीने वाढले आहे. व्यवसाय सुरू जरी झाल्याचे समाधान असले तरी त्याचा वेग अजूनही मंदावलेला आहे. अप्पा बळवंत चौकातील सर्वच दुकानांमध्ये कोरोनाच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेत विक्रीला सुरवात करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टेशनरी कटलरी जनरल मर्चंट असोसिएशनचे दिलीप कुंभोजकर म्हणाले, ‘‘बहुतेक शैक्षणिक संस्थाच आता थेट वह्या, पुस्तके आणि इतर साहित्याची खरेदी करतात. त्यामुळे ट्रेडर्सवर विपरीत परिणाम दिसत आहे. लॉकडाउनमुळे त्याची खरेदीही पुढे ढकलली जात आहे. शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपानुसार पारंपारिक वह्या, पुस्तके खरेदी विक्री व्यवसायाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.’’

शाळेच्या पुस्तकांची खरेदी सुरु झाली असून, गरज पडल्यास प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी कुरियरने साहित्य मागवले जाते. मुख्यत्वे शहरातून ऑनलाइन पद्धतीने साहित्य मागविण्यात येत असून, एखाद्या दुर्मिळ पुस्तकांसाठी पुण्याबाहेरूनही विचारणा होते. फक्त पूर्वीप्रमाणे जास्त पुस्तके दाखवणे शक्‍य होत नाही. कोरोनाच्या दृष्टीने आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत.
- ओंकार जोशी, वर्मा बुक डेपो

लॉकडाउननंतरचा व्यवहार -

  • सॅनिटायझर, थर्मामीटर, सोशल डिस्टसिंग पाळत खरेदी विक्री
  • ऑनलाइन शाळा सुरु झाल्यामुळे निवडक पुस्तके, वह्या आणि इतर साहित्याच्या खरेदीला वेग.
  • ऑनलाईन पद्धतीने साहित्य मागविण्यात भर.
  • ग्राहकाला जास्त व्हरायटी दाखवण्यात मर्यादा
  • दुकानाची खरेदीविक्रीची वेळ मर्यादित
  • शालेय साहित्याच्या विक्रीवर भर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com