आंबोलीला जोराच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान

दत्ता म्हसकर
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

जुन्नर - ऐतिहासिक दाऱ्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली ता.जुन्नर येथे गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

येथील नामदेव भालचिम, वसंत भालचिम, दिगंबर भालचिम, रोहिदास भालचिम, सीताराम भालचिम या शेतकऱ्यांच्या भात खाचरात ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह घुसल्याने भात रोपे व माती वाहून गेली आहे. सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

येथे दोन दिवस जोराचा पाऊस झाला यामुळे मीना नदीला पूर आला होता. ओढे नाले दुथडी भरून वाहत होते. नदी व ओढ्याकाठी असणाऱ्या शेत जमिनीत पुराचे पाणी घुसल्याने पिकाची नुकसान झाली आहे.

Web Title: rice cultivation fail due to rains of amb0ly

टॅग्स