भात शोधुनी जीव शिणला...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

बेबडओहोळ - भात झोडून बाजूला पडलेल्या पळंजातून तासन्‌ तास उभे राहून तांदूळ शोधणाऱ्या चिमुकल्या आढले रस्त्यावरील भात मिलजवळच पाहायला मिळत आहेत. पोटासाठी सुरू असलेली त्यांची धडपड हृदय पिळवटून टाकते. 

बेबडओहोळ - भात झोडून बाजूला पडलेल्या पळंजातून तासन्‌ तास उभे राहून तांदूळ शोधणाऱ्या चिमुकल्या आढले रस्त्यावरील भात मिलजवळच पाहायला मिळत आहेत. पोटासाठी सुरू असलेली त्यांची धडपड हृदय पिळवटून टाकते. 

सध्या मावळातील सर्वच गावांतून भातकाढणी पूर्ण झाली आहे. काढलेला भात झोडल्यानंतर पाखडून बाजूला पडणारे पळंज कधी शेतात, तर कधी रस्त्याच्या कडेला, ओढ्यामध्ये टाकून दिले जाते. त्याचा अन्य कोणताही उपयोग नसतो. मात्र, अनेकदा त्यामध्ये भाताचे कण दडलेले असतात. त्याकडे सहसा लक्ष दिले जात नाही. सध्या येथील ओढ्याच्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी पळंज आणून टाकले आहेत. त्यामुळे जवळील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुली या पळंजातून तांदळाचे दाणे शोधत आहे. तासन्‌ तास उन्हामध्ये उभे राहून या मुली पळंज सुपातून उफणून भात मिळवतात. त्यातून साधारण एखादा किलो तांदूळ त्यांना मिळतो. 

एकीकडे अन्नाची अतोनात नासधूस होत असताना, दुसरीकडे तांदळाच्या काही दाण्यांसाठी जिवाचे रान करणाऱ्या या मुली सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहेत.

Web Title: Rice Girl

टॅग्स