सीसीटीव्हीद्वारे शोधली १० दिवसात रिक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - रिक्षात विसरलेले दोन लाख रुपयांचे दागिने महिलेला परत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. संबंधित रिक्षा शोधण्यासाठी पोलिसांनी दहा दिवस लोहियानगर ते पुणे स्टेशन मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. अखेर रिक्षाचालक सापडला, पण त्याच्याकडे पर्स नव्हतीच. रिक्षा तपासल्यानंतर रिक्षाच्या डिकीमध्ये पर्स जशीच्या तशी सापडली. विसरलेले लाखमोलाचे सोने पाहिल्यानंतर महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि मनात पोलिसांविषयी कृतज्ञता प्रकटली.  

निकाह ऊर्फ सुरैया शेख (वय ५५, रा. लोहियानगर) या आपल्या सुना व नातवंडांसमवेत २० जुलै रोजी रिक्षाने पुणे स्टेशन येथे गेल्या. तेथून फलाटावर रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी गेल्या. अर्ध्या तासाने आपल्याजवळील सोने ठेवलेली पर्स रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. दौंडला जाण्याचे रद्द करून त्यांनी घरच्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मुलगा मोहसीन व स्वीकृत नगरसेवक युसूफ शेख यांच्या मदतीने खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलिस कर्मचारी आशिष चव्हाण, रवींद्र लोखंडे, विनोद जाधव यांच्या पथकाने रिक्षाचा शोध घेण्यास सुरवात केली. पान ८ वर 

माझे व दोन सुनांचे असे सात तोळे सोने होते. आमच्या माहेरचे आणि सासरकडून ते मिळालेले होते. त्यामुळे हे सोने रिक्षात विसरल्यामुळे जीव कासावीस झाला होता. पण पोलिसांनी दहा दिवसांतच रिक्षाचालकाचा शोध घेतला. रिक्षाच्या डिकीत सोने आढळून आले. गेलेले सोने पुन्हा मिळाल्याचा खूप आनंद झाला.
- निकाह ऊर्फ सुरैया शेख

Web Title: Rickshaw detected in CCTV within 10 days