पुण्यात रिक्षाचालक रिक्षा बाजूला थांबवायचा अन् विद्यार्थिनीशी...

Rickshaw driver arrested for sexually molesting student in pune
Rickshaw driver arrested for sexually molesting student in pune
Updated on

पुणे : दररोज शाळेत सोडण्यासाठी नेमलेल्या रिक्षा चालकाने विद्यार्थीनीला दमबाजी करीत तिच्याशी अश्‍लिल चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली. दत्ता गवळी (वय 55, रा. कोथरूड) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली.

पुणे: उधारी मागतोस का? तुझा धंदा बंद करेल...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या मुलीला दररोज शाळेत सोडण्यासाठी रिक्षा लावली होती. त्यानुसार, त्यांची मुलगी दत्ता गवळी याच्या रिक्षातून दररोज जात होती. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यापासून रिक्षाचालक गवळी हा फिर्यादी यांची मुलगी रिक्षात बसल्यानंतर रिक्षा रस्त्याच्याकडेला थांबून तिच्याशी अश्‍लिल चाळे करीत होता. तसेच हा प्रकार मुलीने तिच्या आई-वडीलांना सांगितल्यास सगळ्यांना बघून घेण्याची धमकी देत होता. त्यामुळे पिडीत मुलगी घाबरली असल्याने तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोपीकडून दिवसेंदिवस त्रास वाढू लागल्याने मुलगी शाळेमध्ये जाण्यास घाबरत होती. त्यामुळे तिच्या पालकांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तिने रिक्षाचालकाकडून घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणाची पालकांनी गांभीर्याने दखल घेत चतुःश्रृंगी पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर रिक्षाचालकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, चतुःश्रृंगी पोलिसांनीही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रिक्षा चालकास तत्काळ अटक केली.

पुण्यात परदेशी महिलेने मागितली लिफ्ट मग बलात्कार अऩ्...
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com