मंदीच्या काळात सोन्याने भरलेली बॅग रिक्षाचालकाने केली परत

मंदीच्या काळात सोन्याने भरलेली बॅग रिक्षाचालकाने केली परत

घोरपडी : प्रवास करताना अनेकजण आपल्या वस्तू रिक्षामध्ये विसरतात. काही रिक्षाचालक प्रामाणिकपणे परत करतात. असाच एक प्रकार काल घोरपडीमध्ये घडला. रिक्षामध्ये विसरलेली प्रवाशाची सोन्याने भरलेली बॅग रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे परत केली.

या बॅगेमध्ये अकरा तोळे सोन्याचे दागिने, २५० चांदीचे दागिने आणि वीस हजार रोख रक्कम होती. रिक्षा चालकाने मनात आणले असते तर त्याने ते दागिने व पैसे काढून देखील घेतले असते. मात्र, या रिक्षा चालकाने प्रमाणिकपणे बॅग परत करुन इतर रिक्षा चालकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

घोरपडी मधील आदर्श पार्क मध्ये राहणारे विठ्ठल मापरे त्याची रिक्षा (नं एम.एच .१२ एन.डब्ल्यु ३५०५)  पॅसेजरला सोडल्यानंतर बी.टी. कवडे रस्ता येथील पामग्रोव्हज रिक्षा स्टँड येथे लावली. त्यावेळी त्यांना रिक्षात  एक बॅग दिसली. हडपसरला सोडलेल्या प्रवाशांची बॅग असावी हे लक्षात आल्यावर त्यांनी रिक्षा पोलीस चौकीत नेली. त्या बॅग बाबत पोलिसांना माहिती दिली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्याच वेळी हडपसर पोलीस स्टेशन मधून रिक्षात बॅग हरवल्याची तक्रार आली आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. तक्रारदार मेहबुब शेख (वय ६३ वर्ष )व त्याची पत्नी शहनाज शेख (वय ५३) यांना घोरपडी पोलिसांनी बोलावून घेतले. त्यावेळी त्यांची हरवलेली बॅग सर्व मुद्देमालासह परत करण्यात आली. सोने, चांदी व पैशासह बॅग परत मिळाल्याने या वृध्द जोडप्याला आनंद झाला. त्यांनी त्या रिक्षाचालकाचे आभार मानले. 

या तपास कार्यात मुंढवा स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कदम, पोलीस कर्मचारी सहा. पोलीस फौजदार निसार शेख, पो. ना. बोबडे, पो. शि होळकर यांनी ही कामगिरी केली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेली वीस वर्ष रिक्षा चालवतो, पण प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे आजच्या कठीण काळात सुद्धा त्या बॅगेतील वस्तूंना हात लावायचा मोह झाला नाही. लॉकडाऊनमुळे चार महिने रिक्षा बंद होती. आता पण दिवसाला शंभर रुपये मिळणे कठीण झाले आहे. पण आपली नीतिमूल्ये सोडली नाही. त्यामुळे सुखाने जगू शकत आहे.  बॅग परत दिल्याने त्या प्रवाशांना त्यांचे दागिने व पैसे मिळाल्याचे मला समाधान आहे.-विठ्ठल मापारे, रिक्षाचालक 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com