तनिष्का निवडणुकीला सर्वतोपरी सहकार्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

पुणे  - ‘तनिष्कांच्या निवडणुकीचा रिक्षांद्वारे प्रचार करू, मतदानास जाणाऱ्यांना मोफत रिक्षा देऊ, प्रवाशांना तनिष्का निवडणुकीचे महत्त्व पटवून देऊ’, असा निर्धार शहरातील रिक्षा संघटनांनी केला. ‘सकाळ’च्या ‘तनिष्का व्यासपीठ’द्वारे महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होत आहे. यामुळे या निवडणुकांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासनही या पदाधिकाऱ्यांनी दिले.

तनिष्का निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या बैठकीस रिक्षा संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिक्षा पंचायतीचे सिद्धार्थ चव्हाण, प्रकाश वाघमारे, आनंद बेलमकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे बाबा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा सेनेचे नाना क्षीरसागर, आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे असगर बेग, फारुक बागवाले, सुभाष करांडे, महाराष्ट्र वाहतूक पंचायतीचे सदाशिव तळेकर, साई कृपा रिक्षा संघटनेचे शंकर अंबुलगे, केईएमसी रिक्षा पंचायतीचे रुकुमोदीन शेख, तुषार पवार, शिवाजीनगर ऑटो रिक्षा संघटनेचे कानिफनाथ घोरपडे, महाराष्ट्र हमाल सेनेचे हृषीकेश मोरे, माथाडी कामगार संघटनेचे किरण लोखंडे आदी उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, ‘‘निवडणुकीसाठी पत्रके, स्टीकर, तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे मतदारांना माहिती देण्यासाठी प्रयत्न करून अधिकाधिक महिलांना मतदानाचे आवाहन केले जाईल.’’ चव्हाण यांनी ‘महिला प्रवाशांना या निवडणुकीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करू.’ असे सांगितले. बेग म्हणाले, ‘‘निवडणुकीबाबतची माहिती आम्हाला द्यावी, संघटनेबरोबरच वैयक्तिक पातळीवर आम्ही महिला मतदार अधिक संख्येने कसा प्रतिसाद देतील, यादृष्टीने प्रयत्न करू.’’ क्षीरसागर यांनीही निवडणुकीचा प्रचार करण्यास प्राधान्य देण्याचे आश्‍वासन दिले.  

वाघमारे म्हणाले,  ‘‘तनिष्का निवडणूक प्रक्रियेची सीडी तयार करून द्यावी. त्या माध्यमातून आम्ही प्रचार करू.’’ रिक्षा चालक-मालकांच्या व्हॉट्‌सॲप ग्रुप व फेसबुक पेजवर निवडणुकीबाबत अधिकाधिक माहिती पोचविण्यास प्राधान्य देऊ, असेही ‘आप’ रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: rickshaw organisation supported to tanishka election

टॅग्स