अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

पुणे : शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस न्यायालयाने 10 सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. एन. सोनावणे यांनी हा निकाल दिला.

भाजपच्या हातून सत्ता गेल्याने पुणे महापालिकेतही 'हे' मोठे बदल

विक्रम कोडेने बासूमाटा याला शिक्षा देण्यात आली. या प्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. डिसेंबर 2016 रोजी कोंढवा परिसरात हा प्रकार घडला होता.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

घटनेच्या काही महिन्यांपूर्वी संबंधित मुलगी तिची आई आणि भावासह कोंढवा परिसरात राहत होती. त्यावेळी बासूमाटा हा त्यांच्या शेजारच्या खोलीत राहत. मात्र त्यानंतर पीडित मुलीचे कुटुंब दुसरीकडे राहायला गेले होते. मात्र तो नियमित तिच्या घरी येत. संबंधित मुलीस तिच्या आईने व बासूमाटा याने घरकामावरून मारहाण केली होती. त्यामुळे मुलगी घरातून पळून गेली. त्यानंतर ती यापूर्वी राहत असलेले घरमालकीनीकडे गेली होती. मात्र, तोपर्यंत तिच्या आईने मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पूर्वीच्या घरमालकीनीने तिला पुन्हा घरी जाण्याचा व याबाबत पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मुलीने तक्रार दिली होती. मात्र अत्याचार झाल्याचे तिने तक्रारीत नमूद केले नव्हते. पण वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिने मात्र सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार बासूमाटा यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शरद पवार यांच्यामुळे माझा राजकीय पुर्नजन्म  : छगन भुजबळ
खटल्याचे कामकाज सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी पाहिले. तर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बी. वाय. राऊत यांनी केला. 

का आहे रेबीज लसीकरण गरजेचे? 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rigorous Imprisonment for Ten years to the rapist of a minor girl