शरद पवार यांच्यामुळे माझा राजकीय पुर्नजन्म  : छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

भुजबळ म्हणाले, "मी कारागृहात असताना समता परिषदेचे सर्व कार्यकर्ते हे माझ्या आणि माझ्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले आणि मला धैर्य व धीर दिला. यामुळे या कार्यकर्त्यांचे, येवला मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि प्रचंड मतांनी पुन्हा आमदार केले आणि शरद पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी देऊन, माझा राजकीय पुर्नजन्म केला आहे. त्यामुळे या सर्वांचे मी आभार मानतो." 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे आज माझा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीदिनीच माझा राजकीय पुर्नजन्म झाल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि नियोजित मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (ता.२८ ) पुण्यात सांगितले. त्यामुळे मी शरद पवार,  समता परिषदेचे कार्यकर्ते आणि येवल्याचे मतदार यांचे जाहीर आभार मानत असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. हे सांगताना आणि आभार मानताना भुजबळ प्रचंड भावूक झाले.  
       
शरद पवारांनी दोघांना निवडले त्यातील मी एक : छगन भुजबळ​ 

पुण्यातील समता भूमित आज भुजबळ यांच्या हस्ते ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा महात्मा फुले समता पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.        
     
मी आज शपथ घेणार नाही : अजित पवार

भुजबळ म्हणाले, "मी कारागृहात असताना समता परिषदेचे सर्व कार्यकर्ते हे माझ्या आणि माझ्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले आणि मला धैर्य व धीर दिला. यामुळे या कार्यकर्त्यांचे, येवला मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि प्रचंड मतांनी पुन्हा आमदार केले आणि शरद पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी देऊन, माझा राजकीय पुर्नजन्म केला आहे. त्यामुळे या सर्वांचे मी आभार मानतो." 

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My political rebirth due to Sharad Pawar said Chhagan Bhujbal