पुणे शहरातील रिंगरोड प्रकल्प सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून पूर्ण होइल

पुणे शहर आणि राज्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला रिंगरोड प्रकल्प सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून पूर्ण होइल, असा विश्वास डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.
Ring Road
Ring RoadSakal

पुणे - भूसंपादन प्रक्रिया (Land Acquisition Process) गतीने पूर्ण केल्यास तेवढ्याच गतीने प्रकल्प पूर्ण होतो. समृद्धी महामार्ग हे त्याचे उत्तम उदाहरण असून, पुणे शहर आणि राज्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला रिंगरोड प्रकल्प (Ringroad Project) सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून पूर्ण होइल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केला. (Ring Road Project in Pune City Completed Through the Joint Efforts of All)

रिंगरोड आणि पुणे- नाशिक रेल्वे मार्ग हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी भूसंपादनाच्या मोजणी प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे रिंग रोड आणि पुणे- नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी जमीन मोजणी आणि मूल्यांकन कार्यपद्धतीबाबत कार्यशाळा आयोजिली होती.या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, उपायुक्त नंदिनी आवडे उपस्थित होते.

Ring Road
पुणे विद्यापीठात Foreign Languageसाठी अ‍ॅडमिशनला सुरूवात

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ‘या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना काय सेवा देणार आहोत, याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यातील रिंगरोड प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्या घेण्यात येतील.’ उपायुक्त जयंत पिंपळगावकर यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत माहिती दिली. अधीक्षक अभियंता आबासाहेब नागरगोजे यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि तांत्रिक माहिती दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक सुनील माळी, उपजिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे यांनी भूसंपादन आणि मूल्यांकन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंके यांनी प्रास्ताविक केले. उपअभियंता संदीप पाटील यांनी आभार मानले.

पुणे महानगरासोबतच राज्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. रिंगरोड तसेच रेल्वे प्रकल्पासाठी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. गावनिहाय बैठका घेऊन भूसंपादन प्रक्रियेला गती देत रिंगरोड प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com