रिंगरोडसाठी ४२ हेक्‍टर भूसंपादनाचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणाऱ्या रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. हवेली तालुक्‍यातील पाच गावांमधून जाणाऱ्या साडेचार किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे ४२ हेक्‍टर जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव प्राधिकरणाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

पहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली दरम्यान ३३ किमीचा रिंगरोड होणार आहे. यातील १६ किलोमीटर रिंगरोडची जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. पिसोळी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी व आंबेगाव खुर्द या पाच गावांमधील ४२ हेक्‍टर जागेचा भूसंपादन प्रस्ताव नुकताच जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. मध्यंतरी राज्य सरकारने सार्वजनिक प्रकल्पांसाठी आगाऊ जागा ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच ही जागा पीएमआरडीएच्या ताब्यात येण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. रिंगरोडसाठी पीएमआरडीएकडून ‘टीपी स्कीम’ (नगररचना योजना) हे मॉडेल राबविले जात आहे.

थेट वाटाघाटीद्वारे खरेदी 
भूसंपादित करण्यात येणारी सुमारे ४२ हेक्‍टर जागा ही खासगी मालकीची आहे. ती वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करून ताब्यात घेतली जाणार आहे. जिल्हा प्रशासन संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादनाचा मोबदला ठरविणार आहे. जिल्हा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेतल्यानंतर पीएमआरडीएकडे ती हस्तांतरित केली जाणार आहे.

Web Title: Ringroad 42 Hector Land Acquisition Proposal