

Danve Visits Bereaved Families, Says Crime Surge Reflects Failure of Enforcement System
sakal
हडपसर: ‘‘कागदावर गुन्हेगारी कमी झालेली असली तरी प्रत्यक्षात नागरिकांमध्ये गुन्हेगारीची दहशत कायम आहे. आजही जेलमध्ये बसून गुन्हेगार गुन्हे घडवून आणत आहेत. शिक्षणाचे माहेरघर आता गुन्हेगारांचे माहेरघर होत आहे. हे दुर्दैवाने नमूद करावे लागते. गुन्हेगारी वाढत आहे, नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल अविश्वास वाढलेला आहे. पोलिस आयुक्त झोपलेले आहेत काय?,’’ अशा कठोर शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला.