ऋतुजाच्या शिक्षणाच्या आकांक्षेला मिळाले पंख

rutuja amle.jpg
rutuja amle.jpg
Updated on

आपटाळे (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोतार्डे येथील ऋतुजा प्रकाश आमले या विद्यार्थिनीने शालांत परीक्षेत 99. 60 टक्के गुण मिळवत उत्तर पुणे जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ऋतुजाने हे यश मिळविल्याबद्दल पुढील ऑनलाईन शिक्षणासाठी सकल मराठा समाज जुन्नर शिवनेरीच्या वतीने ऋतुजा हिचा लॅपटॉप भेट देऊन सत्कार करण्यात आला. 

ऋतुजा आमले या विद्यार्थिनीने जुन्नर येथील अण्णासाहेब आवटे विद्यामंदिरात शालेय शिक्षण पूर्ण केले. मागील महिन्यात जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात ऋतुजा आमले हिने 99. 60 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले होते. ऋतुजाची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशाने सकल मराठा समाज जुन्नर शिवनेरीचे संस्थापक दत्ता म्हसकर व नगरसेवक सुनील ढोबळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते. या आवाहनाला समाजबांधवाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या निधीतून ऋतुजाला पुढील शिक्षणासाठी लॅपटॉप भेट देण्यात आला. 
 

यावेळी संस्थापक दत्ता म्हसकर,  नगरसेवक सुनील ढोबळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तुषार लाहोरकर, बोतार्डेचे सरपंच उत्तम घुले, उद्योजक विनायक वाबळे, प्रगतशील शेतकरी संजय खंडागळे उपस्थित होते. समाजाने केलेल्या मदतीबाबत ऋतुजा आमले व तिच्या कुटुंबाने समाजाचे आभार मानले. प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत ऋतुजाने मिळविलेले यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहील. समाजाला भूषणावह कामगिरी केल्याने समाजाने नोंद घेतली, असल्याचे म्हसकर यांनी सांगितले.
      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com