नदीसुधार प्रकल्पाची टिंगल करणाऱ्यांचाही एकमातने पाठिंबा : मोहोळ

याप्रकल्पाचे ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे.
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSakal

पुणे : फेसबुक लाइव्हमधून नदीसुधार प्रकल्पाची टिंगल करणाऱ्यांनी देखील आज शहराच्या विकासाच्या सर्व प्रकल्पांना एकमताने मान्यता दिली. बाहेर कितीही आंदोलन करू देत बैठकांमध्ये पाठिंबा देतात, अशी टीका करत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. (Pune Corporation News)

पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत महापौर म्हणाले, ‘‘मुळामुठा संवर्धनासाठी मैलापाण्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. याप्रकल्पाला काहीसा विलंब झाला आहे, पण आता हा प्रकल्प सुरू होत आहे. पुढील काही वर्षात नदीचे व शहराचे चित्र बदलणार आहे. याप्रकल्पाचे ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे.

Murlidhar Mohol
मोदी सरकारच्या दडपशाहीविरुद्ध महाविकास आघाडीचे आंदोलन

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षापासून शहरातील महत्त्वाचे प्रकल्प रखडले होते. त्यांना आता गती मिळणार आहे. शिवणे व खराडी हे रस्ता देखील महत्त्वाचा आहे, पण राष्ट्रवादी व शिवसेनेच्या लोकांनी रस्ते अडविल्याने काम रखडले आहे.

सभागृहनेते गणेश बीडकर म्हणाले, ‘‘शहराचा विकास करणे ही भाजपची भूमिका आहे. आमच्या भूमिकेला विरोधकांचाही पाठिंबा असल्याने स्थायी समितीमध्ये एकमताने विषय मंजूर झाले. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘नदी सुधार प्रकल्पात महापालिकेचा हिस्सा १५ टक्के आहे, पण आता खर्च वाढल्याने त्यानुसार केंद्र सरकारने २४५ कोटी रुपये द्यावेत अशी मागणी करणार आहोत.

Murlidhar Mohol
करमाळा : माजी आमदार नारायण पाटील करणार वीज प्रश्नावर धरणे

जायकाचे कर्ज केंद्र सरकार फेडणार

नदी संवर्धन प्रकल्पासाठी जायकाच्या जायका कंपनीने केंद्र सरकारला ८४२ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.या कर्जाचा भार पुणेकरांवर पडणार नाही तर केंद्र सरकारच याचे हप्ते फेडणार आहे. त्यास आज स्थायी समितीने मान्यता दिली, याप्रक्रियेमध्ये सर्वांनी सहकार्य केले, असे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हीडीओ कॉलवरून संवाद साधताना सांगितले.

भाजपचा निवडणूक निधी गोळा करायचा प्रयत्न

भाजपने आज अडीच हजार कोटीचे विषय मंजूर केल्याने त्यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली. ‘‘स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असूनही त्यांना व्हीप बजावण्याची नामुष्की आली. आम्ही नदी सुधार व नदी काठ सुधार या दोन्ही प्रकल्पांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. पण आजच्या बैठकीतील त्यांचा व्यवहार संशयास्पद होता.ऐनवेळी प्रस्ताव दाखल करून त्यास मान्यता घेतली, अशी टीका जगताप यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com