दौंड शहरातील रस्ता तीन फुटांपर्यंत खचला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

ट्रॅक्‍टरची ट्रॉली अडकली;

रोलिंग न केल्याचा परिणाम

 

दौंड : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी ते हुतात्मा चौक दरम्यान रस्त्याच्या एका बाजूचा भाग अचानकपणे तीन फुटांपर्यंत खचला. त्यात ट्रॅक्‍टरची ट्रॉली अडकली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

ट्रॅक्‍टरची ट्रॉली अडकली;

रोलिंग न केल्याचा परिणाम

 

दौंड : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी ते हुतात्मा चौक दरम्यान रस्त्याच्या एका बाजूचा भाग अचानकपणे तीन फुटांपर्यंत खचला. त्यात ट्रॅक्‍टरची ट्रॉली अडकली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

शहरात आज दुपारी ही दुर्घटना घडली. रेल्वे प्रशासनाकडून जून महिन्यात सांडपाणी वाहून नेण्यासाठी कुरकुंभ मोरी ते हुतात्मा चौकापर्यंत भूमिगत पाइप टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. दरम्यान आषाढी एकादशीसाठी हा रस्ता खुला करावयाचा असल्याने जुलै महिन्यात कुरकुंभ मोरी ते हुतात्मा चौकापर्यंत मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु आवश्‍यकतेप्रमाणे रोलिंग न केल्याने आज या रस्त्याचा काही भाग तीन फुटांपर्यंत खचला. रस्ता खचण्यापूर्वी एक स्कॉर्पिओ जीप पुढे गेली आणि त्यामागील खडी वाहून नेणारी ट्रॅक्‍टर ट्रॉली खचलेल्या भागात अडकली. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक्‍टर जागेवर उभा केल्याने त्याचा जीव बचावला.

बकरी ईदमुळे आज सकाळी ईदगाह मैदानाकडे हजारो मुस्लिम बांधव या रस्त्यावरूनच गेले होते. ईदची सुटी असल्याने विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून आज वर्दळ नव्हती. सततच्या खोदकामामुळे आधीच हा रस्ता ओबडधोबड झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने खचलेल्या रस्त्याचा खड्डा पाहून अनेकांना धडकी भरली.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road crack in Daund city